म्हाडाची 2020 घरांची लॉटरी, 1 लाख जणांचे अर्ज, मंत्री अतुल सावे यांच्याकडून महत्त्वाची माहिती

"मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सांगितलं प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं. मोदींनी देशासाठी संकल्प केला. आम्ही राज्यात पूर्ण देत आहोत. सोलापूरच्या रे नगरात ३० हजार घरांचा संकल्प केला होता. १५ हजार घरे दिले", असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.

म्हाडाची 2020 घरांची लॉटरी, 1 लाख जणांचे अर्ज, मंत्री अतुल सावे यांच्याकडून महत्त्वाची माहिती
मंत्री अतुल सावे
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 7:04 PM

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘इन्फ्रा अँड हाऊसिंग कॉन्क्लेव्ह’मध्ये सहभागी होत म्हाडाच्या लॉटरी विषयी महत्त्वाची माहिती दिली. “महाराष्ट्राचं आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही या मुंबईत या महाराष्ट्रात सामान्य मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध झाली पाहिजे, यामुळे म्हाडाच्या माध्यमातून अनेक स्कीम जाहीर केल्या. लॉटरीच्या माध्यमातून सर्वांना घरे देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्याही २ हजार २० घरांची लॉटरी आहे. १ लाख लोकांनी अर्ज केले आहेत. आम्हाला खात्री आहे की या माध्यमातून या ड्रॉमधून घरे लागतील”, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.

“प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पाच कोटी घरे दिली. आता पर्यंत ३ कोटी घरे देणार आहोत. सामान्य जनतेला स्वत:चं घर असावं, प्रत्येकाचं हे स्वप्न असतं. मोदी पहिल्यांदाच पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सांगितलं प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं. मोदींनी देशासाठी संकल्प केला. आम्ही राज्यात पूर्ण देत आहोत. सोलापूरच्या रे नगरात ३० हजार घरांचा संकल्प केला होता. १५ हजार घरे दिले. मार्चपर्यंत १५ हजार घरे देऊ. आमचे अनेक प्रकल्प पूर्ण होत आले आहेत”, असं अतुल सावे यांनी सांगितलं.

सर्वसामान्यांना परवडणारी घरे कशी दिली जातात?

“पूर्वी म्हाडा म्हणजे १ एसएफआय द्यायचे. जिथे दहा हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तर १० हजार स्क्वेअर फुटाचंच बांधकाम मिळायचं. त्यामुळे लिमिटेड घरे व्हायची. आता आम्ही प्रीमियम घेऊन तीन चार एफएसआय देतो. त्यामुळे तीन चार घरे उपलब्ध होतात. उदा. एखाद्या प्लॉटमध्ये आधी २५ घरे असतील तर एफएसआय चार झाला तर त्याला १०० घरे तिकडे मिळतात. त्याल सेल कंपोनंनट वाढतो. विकासक प्रिमीयम भरतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना परवडणारी घरे मिळतात”, अशी माहिती अतुल सावे यांनी दिली.

“दहा लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणारी गावे आहेत. तिथे आम्ही २० पर्सेंट इन्क्लुसिव्ह म्हणजे ४००० स्क्वेअरमीटरवर काम होतं, त्याला एफएसआय देतो. त्याच्याकडून २५ पर्सेंट इन्क्लुसिव्ह घेतो. ते म्हाडा विकते. त्यातून परवडणारी घरे होतात. या माध्यमातून पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर अशा ठिकाणी आम्ही घरे दिली. आमचा २७ हजार घरांचा आकडा गेला, त्याचं कारण इन्क्लुसिव्ह हाऊसेस अधिकाधिक गोळा केले आणि म्हाडाच्या माध्यमातून वितरीत केले आहेत. त्याचे आम्ही ड्रॉ केले आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वी संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ड्रॉ काढला आहे”, असं अतुल सावे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.