Maharashtra Breaking News LIVE : थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक; महाराष्ट्रातले नेते दिल्लीत दाखल

| Updated on: Jun 26, 2024 | 8:40 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 25 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक; महाराष्ट्रातले नेते दिल्लीत दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची 25 जूनला बैठक होणार आहे. आगामी चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बैठकांना सुरूवात झाली आहे. पुणे ड्रग्स प्रकरणत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखीन एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस सहनिरीक्षक पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल? याचा निर्णय आज दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. भाजपकडून लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे लोकसभेच उपाध्यक्ष विरोधी पक्षाला मिळावे अशी मागणी इंडिया आघाडीने केली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jun 2024 06:32 PM (IST)

    पुण्यात 26 हॉटेल रेस्टॉरंटवर तोडक कारवाई

    पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील एकूण 26 हॉटेल रेस्टॉरंटवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. यापुढेही शहरातील अनधिकृत बार रेस्टॉरंट बरोबर कारवाई केली जाणार आहे. एकूण 37 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर पालिकेने तोडक कारवाई केली.

  • 25 Jun 2024 06:16 PM (IST)

    खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात शिंदे गटाचे जोडे मारो आंदोलन

    सोलापूर : MIM पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाने सोलापूरमध्ये जोडे मारो आंदोलन केले. असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय फिलिस्टीनचा (पॅलेस्टाईन) नारा दिला होता. त्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले.

  • 25 Jun 2024 05:52 PM (IST)

    6 सप्टेंबरला काँग्रेसच्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश होणार – कंगना

    भाजप खासदार कंगना रणौत म्हणाली, “जे लोक आज संसदेत संविधानाचे पुस्तक उचलून ओरडत आहेत, नाटक करत आहेत, त्यांची काळी कृत्ये 6 सप्टेंबरला उघड होतील. ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट मी माझे घर आणि दागिने गहाण ठेवून बनवला आहे.”

  • 25 Jun 2024 05:37 PM (IST)

    मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आज रात्री 8 वाजता इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक

    आज रात्री 8 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दिल्लीतील भारतातील आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

  • 25 Jun 2024 05:25 PM (IST)

    सीएम केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा धक्का

    मुख्यमंत्री केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्याच्या जामिनावरील स्थगिती कायम राहणार आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयावरील स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

  • 25 Jun 2024 05:10 PM (IST)

    राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन लोकसभा सदस्यत्वाची घेतली शपथ

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आणि यावेळी त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. राहुल गांधी यांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी ‘जय हिंद, जय संविधान’चा नाराही दिला.

  • 25 Jun 2024 03:28 PM (IST)

    पुण्यातील L3 बारवर तोडक कारवाई

    पुण्यातील एल 3 बारवर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

  • 25 Jun 2024 03:24 PM (IST)

    प्रकाश महाजन यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

    उद्धव ठाकरे यांना उस्मान अली म्हणावं का असा संशय आहे. यांनी आता फक्त नमाज पडायचे बाकी ठेवले आहे. हे दोघे बाप लेक उद्या हजला जाण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.

  • 25 Jun 2024 03:01 PM (IST)

    कल्याणीनगर अपघात प्रकरण, अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर

    पुण्यातील कल्याणीनदगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. पोर्शे कारने त्याने दोन जणांना उडवले होते. ज्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.

  • 25 Jun 2024 02:57 PM (IST)

    मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकाची मोठी कारवाई

    शिक्षक मतदार संघाचे पैसे वाटप करण्याच्या तयारीत असतांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मनमाड पोलीस आणि आचारसंहिता उल्लंघन पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे. मनमाड गणेश नगर भागात एका बंगल्यात पैसे वाटले जाणार होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला. बंगल्यातून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे प्रचार साहित्य व पैश्यांचे पाकिटे जप्त केले. निवडणुकीला एक दिवस बाकी असतांना कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

  • 25 Jun 2024 02:45 PM (IST)

    थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक

    थोड्याच वेळात काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. काँग्रेस मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकांची तयारी आणि विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. बैठकीसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी चार वाजता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

  • 25 Jun 2024 02:30 PM (IST)

    सदाभाऊ खोत, पडळकरांच्या नेतृत्वात सांगलीत हंटर मोर्चा

    माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत हंटर मोर्चा काढण्यात आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा, यासह विविध मागणीसाठी मोर्चा काढला गेला आहे. स्टेशन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चाच्या संदर्भात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी ध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी केली.

  • 25 Jun 2024 02:16 PM (IST)

    पाण्यासाठी नागरिकांचा घेराव

    पाण्यासाठी नागरिकांचा पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला आहे. नागरिकांचा रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ महिलेला चक्कर आली. पाणी येत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा संतप्त नागरिकांनीचा पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.

  • 25 Jun 2024 01:47 PM (IST)

    नवनाथ वाघमारे यांची जरांगेंवर टीका

    जरांगे यांना पाचवीच्या वर्गात ऍडमिशन दिलं पाहिजे. उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांचा टोला. जरांगे यांचं वय आहे का आता शिकायच. ज्या वेळेला शिकायचं होत त्या वेळी शिकला नाही, चुकीचं कामं करत बसला, असे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले.

  • 25 Jun 2024 01:35 PM (IST)

    काँग्रेसने देशभरातील राज्य सरकार 90 वेळा पाडले- भारती पवार,माजी केंद्रीय राज्यमंत्री

    75 वेळा संविधानमध्ये काँग्रेसने बदल केला याबाबत काँग्रेसने बोलावे. यंदाच्या लोकसभेत काँगेसने खोटा प्रचार केला संविधान बदलणार असा प्रचार केला आमच्या प्रश्नावर काँगेसने उत्तर द्यावे

  • 25 Jun 2024 01:17 PM (IST)

    राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज मिळताना दिसत नाही- सदाभाऊ खोत 

    सदाभाऊ खोत यांनी मोठे भाष्य केले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, काही ठिकाणी अनियमित पाऊस झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज मिळताना दिसत नाहीये.

  • 25 Jun 2024 01:04 PM (IST)

    गाव बंदीचे बॅनर लावू नका

    लक्ष्मण हाके यांचं ओबीसी तरुणांना आवाहन. आपली लढाई कायद्याने लढायची आहे. निवडणूक काळात या गोष्टी करा. सध्या कोणालाही विरोध करू नका. विधानसभा निवडणूक काळात गाव बंदी करा

  • 25 Jun 2024 12:41 PM (IST)

    Maharashtra News : राज्यात जे चाललय ते चांगलंच आहे – भरत गोगावले

    “राज्यात जे चाललय ते चांगलंच आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला वातावरण नसेल. सरकारच यापुढेही चांगलचं सुरु रहाव. राज्यात महायुतीची सत्ता येईल. जागा वाटपावर वरच्या टप्प्यात चर्चा होईल” असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले.

  • 25 Jun 2024 12:21 PM (IST)

    National News : लोकसभा अध्यक्ष पदासाठी उद्या सकाळी 11 वाजता मतदान

    इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी अर्ज भरला. लोकसभा अध्यक्ष पदासाठी उद्या सकाळी 11 वाजता मतदान. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी अर्ज भरला.

  • 25 Jun 2024 12:17 PM (IST)

    Maharashtra News : पुणे ड्रग्ज प्रकरण, तरुणाला मुंबईतून घेतलं ताब्यात

    पुण्यातील L-3 हॉटेलमधील ड्रग्ज प्रकरण. ड्रग्ज सेवन करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात. पुणे पोलिसांनी तरुणाला मुंबईतून घेतलं ताब्यात.

  • 25 Jun 2024 12:14 PM (IST)

    Maharashtra News : विधान परिषदेसाठी शरद कोळी यांचे नाव चर्चेत

    विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचे नाव चर्चेत. पडत्या काळात पक्षासाठी शरद कोळी यांनी मोठे योगदान दिल्याने कोळींच्या नावाची चर्चा. शरद कोळी समर्थकांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट. पक्ष फुटीनंतर पहिला पक्षप्रवेश शरद कोळींचा झाल्याने विधानपरिषद मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी.

  • 25 Jun 2024 11:21 AM (IST)

    निरीक्षक अशोक सायकर यांनी पोस्टर फाडलंय

    मोठी बातमी समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात पोलिसांनीच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर फाडलं आहे. कोल्हापूरच्या माणगाव मध्ये हा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने माणगावमधील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला निवेदन देण्याचे आंदोलन केलं होतं. आंदोलनासाठी आणलेलं पोस्टर पोलिसांनी आंदोलनाआधीच फाडलं. निरीक्षक अशोक सायकर यांनी पोस्टर फाडलंय.

  • 25 Jun 2024 10:57 AM (IST)

    Maharashtra News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने L 3 बारवर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ समोर

    राज्य उत्पादन शुल्क विभागाने L 3 बारवर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ समोर… आरोपींना अटक करतानाचा व्हिडिओ आला समोर… राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित हॉटेल सील करत परवाना करण्यात आला रद्द… L3 मधून 241 लिटर विदेशी मद्य राज्य उत्पादनशील विभागाकडून जप्त

  • 25 Jun 2024 10:46 AM (IST)

    Maharashtra News : उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपचा शिक्का – संजय राऊत

    उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपचा शिक्का… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 25 Jun 2024 10:43 AM (IST)

    Maharashtra News : कंगना यांनी केलेली मागणी मुर्खपणा – संजय राऊत

    कंगना यांनी केलेली मागणी मुर्खपणा आहे… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. कंगना यांनी महाराष्ट्रा सदनातील सीएमची खोली मागितली होती.

  • 25 Jun 2024 10:35 AM (IST)

    Maharashtra News : झारखंडच्या रांचीमध्ये आरएसएसच्या प्रांत प्रचारकांची बैठक होणार

    झारखंडच्या रांचीमध्ये आरएसएसच्या प्रांत प्रचारकांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ११ ते १३ जुलैदरम्यान रांचीमध्ये ही बैठक होणार आहे. भाडपचे संघटनन सरचिटणीस बी.एल.संतोष सहभागी होणार…

  • 25 Jun 2024 10:18 AM (IST)

    Maharashtra News : ओम बिर्ला आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार

    ओम बिर्ला आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात NDA नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार…

  • 25 Jun 2024 10:04 AM (IST)

    Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके आज खासदारकीची शपथ घेणार… शपथ घेण्यापूर्वी लंके यांचे कुटुंब दिल्लीत दाखल… लंके यांचे आई-वडील आणि कुटुंबीय दिल्लीत दाखल… निवडणुकीची लढाई ही जनशक्ती आणि धनशक्ती अशी होती… निलेश लंके यांच्या वडिलांची प्रतिक्रिया

  • 25 Jun 2024 09:57 AM (IST)

    Marathi News: शासनाने दिंड्यांसाठी नेमली समिती

    महाराष्ट्र शासनाने वारीतील दिंड्यांसाठी 20 हजार चे अनुदान जाहीर केले आहे संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांनी शासनाला हा अनुदानाचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली होती. परंतू शासनाने या संदर्भात अनुदानाचे नियोजन करण्यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

  • 25 Jun 2024 09:42 AM (IST)

    Marathi News: अरविंद केजरीवाल यांचा आज निर्णय

    दिल्ली उच्च न्यायालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊज अव्हेण्यू कोर्टाकडून जामीन देण्यात आला होता. त्यावर ईडीने दिल्ली उच्च न्यायालय गाठले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनावर स्थगिती दिली होती. आता अंतिम निकाल आज देणार आहे.

  • 25 Jun 2024 09:26 AM (IST)

    Marathi News: भाजपचे आणीबाणी विरोधात अभियान

    आणीबाणीची आठवण म्हणून लोकशाहीतील काळा दिवस असा अभियान भारतीय जनता पक्ष देशभर राबवणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.

  • 25 Jun 2024 09:15 AM (IST)

    Marathi News: लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरांदेश्र्वरी यांची नावे चर्चेत

    लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. यामुळे लोकसभेचा अध्यक्ष कोण होणार हे दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला, डी पुरांदेश्र्वरी यांची नावं चर्चेत आहे.

Published On - Jun 25,2024 9:13 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.