AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : भडकाऊ वक्तव्य, केंद्रात तक्रार, अजित दादा vs नितेश राणे, पाहा Video

महायुतीत आता अजित पवार विरुद्घ नितेश राणेच आमनेसामने आल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रक्षोभक वक्तव्यावरुन दादांनी भाजपच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. मात्र अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करु द्या, असं नितेश राणे म्हणालेत. पुन्हा एकदा नितेश राणेंनी सांगलीतून भडकाऊ वक्तव्य केलीत.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : भडकाऊ वक्तव्य, केंद्रात तक्रार, अजित दादा vs नितेश राणे, पाहा Video
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 10:40 PM

बुलडाण्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या समोर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनाच सुनावलंय. अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची थेट तक्रारच भाजपच्या दिल्लीतल्या हायकमांडकडेही केलीय. मात्र अजित पवारांना कुठं तक्रार करायची करु द्या, म्हणत नितेश राणेंनीही इरादे स्पष्ट केलेत. म्हणजेच आता अजित पवार आणि नितेश राणे आमनेसामने आलेत. बुलडाण्यातून अजित पवारांनी नाव न घेता, नितेश राणे, संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंना फटकारलं. पण, सांगलीतून पुन्हा नितेश राणेंनी भडकावू भाषण केलंच. एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान अशी चिथावणी नितेश राणेंनी दिलीय.

विशेष म्हणजे, अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप नितेश राणेंच्याच वक्तव्यावर आहे..त्यावरुनच दादांनी आता दिल्लीतल्या भाजपच्याच हायकमांडकडे तक्रारही केली. हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणेंचं मशिदीत घुसून मारण्याचं प्रक्षोभक वक्तव्य असो की मग शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचं राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा अजित पवार अशा वक्तव्यावरुन संतापलेत.

पाहा व्हिडीओ:-

अजित पवारांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांसह केंद्राच्या नेत्यांकडेही तक्रार केल्याचं दादांचेच मंत्री धनंजय मुंडेंनीही सांगितलंय. तर, केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी त्यावर काय सांगितलं हेही दादांनाच विचारलं पाहिजे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. भाजप आणि शिंदेंची शिवसेना महायुतीतले दोन्ही पक्ष हिंदुत्वावादी म्हणून ओळखले जातात…मात्र अजित पवारांची राष्ट्रवादीला महायुतीचा तसा रंग लागलेला नाही. त्यामुळंच धार्मिक ध्रुवीकरण किंवा हिंदू-मुसलमानावरुन चिथावणीची भाषा होते तेव्हा अजित पवार तात्काळ रिअॅक्ट होतात. मात्र नितेश राणेंनीही दादांना कुठं तक्रार करायची करु द्या म्हणत, ऐकणार नाही असेच संकेत दिलेत.

Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.