Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : भ्रष्टाचाराचे आरोप खोटे, दादांना कोणाला म्हणायचं, पाहा Video

व्हिडीओद्वारे अजित पवारांनी अर्थसंकल्पातील योजनेसह...भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजकीय वाटचालीवरही भाष्य केलंय. आतापर्यंत खोटे आरोप झाले पण एकही सिद्ध झाला नाही. जास्त कामं करतो म्हणून जास्त आरोप होत आहेत, असं अजित पवार म्हणालेत. तर दादांच्या या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंनी भाजपकडेच बोट दाखवलं.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : भ्रष्टाचाराचे आरोप खोटे, दादांना कोणाला म्हणायचं, पाहा Video
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 3:25 PM

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सध्या अजित पवारांना मिळालंय. पण बहुमतामुळंच आपल्याला पक्ष मिळाल्याचं सूचकपणे दादांनी सांगितलं. राजकारणात आल्यापासून आपण पक्ष बदलला नाही. आधीही जनतेचाच होतो, यापुढेही जनतेचाच राहणार,असं अजित पवारांनी म्हटलंय. काही दिवसांआधीच अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला. ज्यात महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना आणलीय…मात्र अशा योजना आणल्या तरी शिव्या शाप मिळत आहेत. पण विकासाचा वादा, अजित दादा हाच आहे, हेही अजित पवारांनी आवर्जून सांगितलं. तर असे व्हिडीओ करणं म्हणजे घसरलेली लोकप्रियता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका जयंत पाटलांनी केली.

अजित पवारांनी जो व्हिडीओ संदेश कार्यकर्ते आणि जनतेला दिला..त्यात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात आलाय. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी टोला लगावला. पक्ष, आणि चिन्हाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यामुळं कोर्टाच्या निर्देशाप्रमाणं प्रकरण न्यायप्रविष्ट अशी सूचना लिहिलेली आहे का?, असा टोला सुळेंनी लगावला.

 पाहा व्हिडीओ:-

लाडकी बहीण योजना, 3 सिलेंडर मोफत देणारी योजना, युवा कार्यप्रक्षिणक योजना. या तिन्ही योजनांना मुख्यमंत्र्यांचं नाव देण्यात आलंय. शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत मदतीचा हाथ एकनाथ, अशा आशयाचे पोस्टरही लागलेत. त्यामुळं महायुतीत श्रेयवादाची लढाई असून त्यासाठीच अजित पवारांनी व्हिडीओ केल्याची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलीय. लोकसभा निवडणुकीत 4 पैकी अवघी एक जागा अ

Non Stop LIVE Update
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ
अजित दादांच्या पत्नीनं लाटल्या वारक-यांसाठी चपात्या, बघा व्हिडीओ.
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला
ठाकरेंचा लाडकी बहीणवरून निशाणा, खोतकरांच्या त्या व्हिडीओचा दिला दाखला.
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.