TV9 चे आज ‘सत्ता संमेलन’, मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक नेते बोलणार महाराष्ट्राच्या राजकारणावर

'टीव्ही 9 भारतवर्ष'कडून 'सत्ता संमेलन महाराष्ट्र' हा कार्यक्रम सोमवारी आयोजित केला आहे. दुपारी 2.30 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. यामध्ये राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील निवडणुकीवर चर्चा होणार आहे.

TV9 चे आज 'सत्ता संमेलन', मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक नेते बोलणार महाराष्ट्राच्या राजकारणावर
सत्ता संमेलन महाराष्ट्रात दिग्गज नेत्यांचा सहभाग.
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 1:35 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहत आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी तिरंगी लढत होईल. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार शिगेला पोहचत असताना टीव्ही 9 भारतवर्षने ‘सत्ता संमेलन महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुंबईतील परळमधील आयटीसी ग्रँड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

दिग्गज नेत्यांचा सहभाग

TV9 भारतवर्षावर ‘सत्ता संमेलन महाराष्ट्र’ हा कार्यक्रम 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. यामध्ये राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. ते निवडणुकीशी संबंधित त्यांची मते मांडणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, नाना पटोले या दिग्गज नेत्यांसह अनेक युवा नेतेही उपस्थित राहणार आहेत. मिलिंद देवरा आणि झिशान सिद्दीकी सारखे तरुण चेहरेही असणार आहेत.

‘वरळीचा शूर कोण?’वर होणार चर्चा

दुपारी 2.30 वाजता ‘सत्ता संमेलन महाराष्ट्र’च्या पहिल्या सत्रात ‘महाराष्ट्राच्या मनात काय आहे?’ यावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी होणार आहेत. यानंतर दुपारी 3.30 वाजता ‘वरळीचा शूर कोण?’ या चर्चेत शिवसेना नेते मिलिंद देवरा आपले विचार मांडतील. मुंबईतील वरळी ही जागा हाय प्रोफाईल सीट बनली आहे. या ठिकाणी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) आदित्य ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे, तर शिवसेनेने (शिंदे) राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट देऊन लढत चुरशीची केली आहे.

अजित पवार यांच्या एनसीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे झिशान सिद्दिकी दुपारी चार वाजता ‘फैसले की घडी’ या चर्चेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत. ‘यावेळेस सत्ता कोणाची?’ हे सत्र सायंकाळी 5.30० वाजता होईल.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल येणार

संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या चर्चेत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल सहभागी होणार आहेत. निवडणुकी दरम्यान महाराष्ट्रातील भाजपच्या राजकीय संधींबाबत ते आपले मत मांडणार आहेत. त्यानंतर 6.30 वाजता ‘महाराष्ट्राची कमळ क्रांती’ नावाच्या चर्चेत भाजप नेत्या पूनम महाजन सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस चर्चासत्रात येणार आहेत. ‘महाराष्ट्रात होणार हॅटट्रिक’ या चर्चासत्रात ते सायंकाळी 7 वाजता सहभागी होतील.

CM शिंदे करणार समारोप

‘सत्ता संमेलन महाराष्ट्र’मध्ये संध्याकाळी 7.30 वाजता ‘पॉवरफुल पवार कौन’ या सत्रात सुप्रिया सुळे आपली मते मांडतील. या सत्रानंतर सायंकाळी 7.45 वाजता ‘मुंबईचा राजा कोण’ या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी ‘कॉमनमन या चर्चासत्रात मुख्यमंत्री शिंदे सहभागी होणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.