Video : टीव्ही 9 स्पेशल रिपोर्ट ! कांदा भिजला, भाजीपाला वाया, विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात आक्रमक
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. तर याच मदतीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात चांगेलच आक्रमक झाले होते.
मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. पिकं अक्षरश: वाया गेलीत. त्यामुळं सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. तर याच मदतीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनात चांगेलच आक्रमक झालेत.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. हाताशी आलेलं पिक गेलं. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. हाच मुद्दा अधिवेशनात विरोधकांनी लावून धरला. पाऊस आणि गारपिटीमुळं गहू गेला. द्राक्षांची बागं भूईसपाट झाली. कांदा भिजला. भाजीपाला वाया गेला. सरकारनं पंचनाम्याचे आदेश दिलेत..पण जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर आहेत. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी, नुकसानीची आकडेवारी आल्यावर मदत देणार असल्याचं म्हटलंय.
विखे पाटलांच्या याच उत्तरावर, पुन्हा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पंचनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. संपावर असतानाही जे कर्मचारी पंचनामे करतायत, ते सहीच करत नसल्याचं अजित पवार म्हणाले. मग असं असेल तर पंचनामे ग्राह्य कसे धरणार ? आणि कधी मदत मिळणार? असा सवाल अजित पवारांनी केलाय.
सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय. त्यासाठी सरकारला पंचनाम्याची वाट आहे. त्यामुळं त्वरित सरकारी सोपस्कार पूर्ण करुन शेतकऱ्याला दिलासा द्यावा हीच अपेक्षा.