मेट्रोतही बसण्यावरून राडा, हातात ‘चप्पल’ घेऊन दोन महिला भिडल्या, दीड लाख लोकांनी व्हिडीओ पाहिलाय; तुम्ही?
मेट्रोतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दोन महिला एकमेकींशी भांडतानाचा हा व्हिडीओ आहे. एकीच्या हातात चप्पल आहे. तर दुसरीच्या हातात स्टिलची बॉटल. बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने या महिला भांडताना दिसत आहेत.
मुंबई : आजच्या काळात दिल्ली आणि मुंबईसारख्या बड्या शहरात मेट्रोतून प्रवास करणं आता कॉमन झालं आहे. एकेकाळी लोकलमधून धक्केबुक्के खात प्रवास करावा लागायचा. अशावेळी लोकलमध्ये भांडणंही ठरलेलीच असायची. मग पुरुषांचा डबा असो की महिलांचा. रोज काही ना काही भांडणं व्हायचीच. कधी बसण्याच्या जागेवरून तर कधी उभं राहण्यावरून. तर कधी उतरण्यावरून. त्यामुळे अनेकजण बस, रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करायचे. त्यामुळे खर्चही वाढायचा. आता मेट्रो आली. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणं सुकर होईल असं सर्वांनाच वाटत होतं. पण लोकल काय आणि मेट्रो काय दोन्ही सारख्याच असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मेट्रोतही जागेवरून भांडणं होताना दिसत आहेत.
तुम्ही मेट्रोतून प्रवास केला असेल तर तुम्हीही एक गोष्ट नोटीस केली असेल, ती म्हणजे… सकाळी किंवा संध्याकाळी मेट्रोत घुसण्यापासून ते आतमध्ये बसण्यापर्यंत संघर्ष करावा लागत आहे. गेट उघडताच लोक आतमध्ये धावत जातात, जागा मिळावी म्हणून लोकांचा आटापिटा असतो. मेट्रोतील गर्दी वाढत असल्याने लोकांची ही धावपळ असते. त्यामुळे कधी कधी जागा मिळवताना लोक आपआपसात भिडतात. भांडणं होतात. आमच्या हाती एक क्लिप लागली आहे. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या दोन महिलांची ही क्लिप आहे. क्लिप पाहिल्यावर बसण्यावरूनच या दोन महिला आपआपसात भिडत असल्याचं दिसून येत आहे.
चप्पल आणि बॉटल
अवघ्या एक मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. मुंबईतील आहे की दिल्लीतील हे स्पष्ट नाहीये. हा व्हिडीओ कधीचा आहे. हे सुद्धा स्पष्ट नाहीये. या व्हिडीओत दोन महिलांची शाब्दिक चकमक सुरू असलेली दिसते. एकीच्या हातात चप्पल आहे. दुसरी महिला चप्पल हातात घेतलेल्या महिलेच्या दिशेने जाते. तिला धडा शिकवण्याची भाषा ती करताना दिसतेय. दुसऱ्या महिलेच्या हातात स्टिलची पाण्याची बॉटल आहे. दोघीही एकमेकींना मारण्याची धमकी देत आहेत. दोघींची प्रचंड शाब्दिक चकमक सुरू आहे. मेट्रोतील इतर महिला ही गंमत पाहताना दिसत आहेत. फक्त एक महिला या दोघांनी समजावताना दिसत आहे. तर आणखी एक महिला या भांडणाची माहिती मेट्रो प्रशासनाला देताना दिसत आहे.
Kalesh B/w Two Women inside Metro Over Seat issue:pic.twitter.com/btWGrYhHJ1
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 29, 2023
असं कोणी भांडतं का?
एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक मिनिट एक सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ एक लाख 60 हजार लोकांनी पाहिला आहे. त्यावर लोकांच्या कमेंटचा पाऊसही पडला आहे. मेट्रोतून प्रवास करताना रोमांस आणि रोमांच दोन्ही दिसतं, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. अशा पद्धतीने जागेसाठी कोणी भांडतं का? असा सवाल एकाने केला आहे. तर नाही नाही… अशा प्रकारची हाणामारी मुलं करत नाहीत, असा दावा एकाने केला आहे.