मुंबईतील चारकोप तलावात दोन तरुण बुडाले, एकाला सुखरूप बाहेर काढलं, दुसरा…
स्थानिकांनी देलेल्या माहितीनुसार संध्याकाळी दोन तरुण तलावाजवळ गेले होते आणि अचानक पाण्यात बुडू लागले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे, मात्र दुसरा तरुण अद्याप बेपत्ता आहे.
मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप तलावात (Charkop lake) आज रात्री अचानक दोन तरुण बुडाले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे. दोन जण बुडाले (Drowned), त्यापैकी एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने घटनास्थळी पोहोचून एका तरुणाला पाण्यातून बाहेर काढले आहे. हे तरूण कसे बुडाले ही माहिती मात्र अजून अधिकृतरित्या प्रशासनाकडून देण्यात आली नाही. सुरूवातील या दोघांना बुडताना स्थानिकांनी पाहिलं त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला त्या ठिकाणी बोलवण्यात आले. त्यानंतर यांच्या बचावकार्याचे प्रयत्न सुरू झाले. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर एकाला वाचवले. मात्र दुसऱ्याला वाचवू शकले नाही. या तलावत त्या बुडालेल्या तरुणाचा शोध सध्या, पोलीस आणि अग्निशमनद दल संयुक्तरित्या घेत आहे.
दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू
स्थानिकांनी देलेल्या माहितीनुसार संध्याकाळी दोन तरुण तलावाजवळ गेले होते आणि अचानक पाण्यात बुडू लागले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे, मात्र दुसरा तरुण अद्याप बेपत्ता आहे. या दुसऱ्या तरुणाबाबत अद्याप तरी काही माहिती समोर आलेली नाही. या प्रकाराने परिसरात मात्र खळबळ माजली आहे. पोलिसांनी या तलावाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तर अग्निशमन दल बुडालेल्या दुसऱ्या तरूणाचा शोध कसोटीने घेत आहे. मात्र प्रशासनाचे हात अद्याप तरी रिकामाचे असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पाण्यात उतरणं धोकादायक
पाणी एखाद्याला जीवदान देऊ शकते तसेच पाण्यात बुडाल्याने ते जीवावरही बेतू शकतं हे या प्रकाराने पुन्हा अधोरेखित केले आहे. योग्य कळजी न घेतल्यास हा हलगर्जीपणा अनेकांच्या जावावर बेततो. त्यामुळे पाण्याच्या ठिकाणी नेहमी योग्य खबरदारी घेतली गेली पाहिजे. काही ठिकाणी समुद्रकिनारी आणि पाण्याच्या ठिकाणी लाईफ गार्डही खबरदारी म्हणून तैनात करण्यात येतात. लाईफ गार्ड असल्यास असे प्रकार टाळण्यास मदत होते. पाण्याच्या ठिकाणी नेहमी सावध राहणे गरजेचे असते. याच ठिकाणी लाईफ गार्ड असता तर हा प्रकार टळला असता.