Uday Samant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? मंत्री उदय सामंत म्हणाले…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samnt) यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

Uday Samant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? मंत्री उदय सामंत म्हणाले...
uday samant
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:32 AM

मुंबई: महाराष्ट्रासमोर कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट उभं राहिलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. उदय सामंत यांनी या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेतली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठांच्या कुलुगुरुंकडून अहवाल मागवला असून त्यानंतर महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही यासदंर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळतयं.

कुलगुरुंच्या अहवालानंतर निर्णय घेणार

महाराष्ट्रात ओमिक्रॉन दुपटीनंन वाढतं आहे. राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल, असं उदय सामंत म्हणाले. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून जो अहवाल येईल त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत निर्णय घेऊ, असं उदय सामंत म्हणाले आहेत. राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असणाऱ्या परीक्षा, अभ्यासक्रम आणि महाविद्यालय सुरु ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली.

उदय सामंत यांचं ट्विट

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट, महाविद्यालय सुरु राहणार की बंद?

मुंबईसह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी आढावा घेतला.

बैठकीला कोण कोण उपस्थित?

अकृषी विद्यापीठातील कोविड 19 आणि ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.

इतर बातम्या:

Export Of Vegetables : भाजीपाला निर्यात करायचा आहे ? मग जाणून घ्या लागणारी आवश्यक कागदपत्रे

Mata Vaishno Devi | वैष्णो देवी मंदिर परिसर चेंगराचेंगरी, मृतांच्या नातेवाईकांना जम्मू-काश्मीर सरकार 10, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत

Uday Samant said decision about college and university will taken after report of vice chancellors

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.