Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. (udayanraje bhosale reached at krishna kunj to meet raj thackeray)

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?
उदयनराजे भोसले, खासदार, भाजप
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 5:38 PM

मुंबई: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, मराठा आरक्षणा संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (udayanraje bhosale reached at krishna kunj to meet raj thackeray)

उदयनराजे भोसले हे आज संध्याकाळी 5 वाजता कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, मराठा आरक्षण आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे राज ठाकरे यांना भेटत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

उदयनराजेंच्या भेटीगाठी

मराठा आरक्षणावर तोडगा निघावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून सर्व पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या पूर्वी त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही त्यांनी भेट घेतली होती. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमात एकाच मंचावरही आले होते.

मुख्यमंत्र्यांशीही खलबतं

तत्पूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही प्रश्न उपस्थित केले होते.

उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पाच प्रश्न

>> जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का? >> जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ? >> ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ? >> महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल. >> MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही? (udayanraje bhosale reached at krishna kunj to meet raj thackeray)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सोनिया गांधींच्या घराबाहेर नाना पटोले दिसताच उदयनराजेंनी गाडी थांबवली अन्….

(udayanraje bhosale reached at krishna kunj to meet raj thackeray)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.