मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा… उद्धव ठाकरे यांचे शरद पवार, काँग्रेस नेत्यांना साकडे
uddhav thackeray: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करा. शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा. मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
![मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा... उद्धव ठाकरे यांचे शरद पवार, काँग्रेस नेत्यांना साकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा... उद्धव ठाकरे यांचे शरद पवार, काँग्रेस नेत्यांना साकडे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/08/uddhav-thackeray-6.jpg?w=1280)
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण होणार? असे विचारले जात आहे. आजच्या मेळाव्यास पृथ्वाराज चव्हाण आहेत, शरद पवार आहेत. मी त्यांना सांगतो, आता मुख्यमंत्रीपदाचा जाहीर करा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. कोणाचेही नाव जाहीर करा. मग उद्धव ठाकरे असो की अन्य कोणी, माझा पाठिंबा असणार आहे, असे उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मविआचा निर्धार मेळाव्यात सांगितले. मुंबईत झालेल्या या मेळाव्यात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग यातून फुंकले गेले.
निवडणुकीसाठी आमची तयारी
उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून आपल्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायचे ठरत होते. आज योग जुळून आला आहे. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे. त्यांनी निवडणूक जाहीर करावी. आमची तयारी आहे. पण तयारी आहे, हे बोलायला सोपे आहे. मात्र, लढाई सोपी नाही. लोकसभेत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजले. लोकसभेची निवडणूक ही संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची होती.
तू राहील नाही तर मी राहील
आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्याची लढाई आहे. तू राहील नाही तर मी राहील या जिद्दीने निवडणूक लढायला पाहिजे. पण हे आपल्यात व्हायला नको. त्यांच्याविरोधात आपल्याला लढायचे आहे, जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. आपली आघाडी आधीपासूनच आहे. सरकारला आता जाग आली आहे. काही केले पाहिजे असे त्यांना आता वाटत आहे. ते डुबक्या मारून पवित्र होता येईल का? असे बघत आहेत. रक्षाबंधनात स्वत:चे फोटो छापत आहेत. पुढच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आम्ही आहोतच. मी पण महाराष्ट्राचे हित जपू. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण त्यांना झोपवू याची शपथ आज घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात केले.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/08/isor.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/08/ajit-pawar.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/08/indepedent-day.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/08/Independence-day.jpg)
त्याची पुनरावृत्ती नको
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आता जाहीर करा. शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा. मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडले ते महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचे काम करतो त्याला गाडून टाकतो. आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी पाठिंबा देतो. जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला. त्याची पुनरावृत्ती नको. २० आणि २५ वर्ष आमची युती होती. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण होते. त्यावेळी एकमेकांच्या पायावर धोंडे पाडले जात होते. पाडापाडीचे राजकारण व्हायचे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.