केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्ती पदावर नकोच, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवा: उद्धव ठाकरे

उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता.

केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्ती पदावर नकोच, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवा: उद्धव ठाकरे
केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्ती पदावर नकोच, राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवा: उद्धव ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 3:43 PM

मुंबई: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला वाटतं राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवले गेले. केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्तीला पदावर बसवता कामा नये, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. आम्ही राज्यपाल हटवण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्या दरम्यान काही घडलं नाही तर आम्ही भूमिका घेणारच आहोत. महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देणारच आहोत, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हा घणाघाती हल्ला चढवला. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं नाही चालणार, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे.

घाईघाईने काही केलं असं होऊ नये म्हणून थांबलो होतो. नाही तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्र बंद व्हावा ही सर्वांची भूमिका आहे. लवकरच कार्यक्रम जाहीर करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.