Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ‘लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय, बेबंदशाहीला सुरुवात’, उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल सर्वात महत्त्वाचा निकाल जाहीर केलाय. या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray : 'लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय, बेबंदशाहीला सुरुवात', उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 8:57 PM

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबद्दल सर्वात महत्त्वाचा निकाल जाहीर केलाय. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे. दुर्देवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही. 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?

काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे. दुर्देवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही. 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे.

आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की 75 वर्षाचा स्वातंत्र्याचा संपलेला आहे आणि आता देशातील लोकशाही संपवून आम्ही बेबंधशाहीला सुरुवात केलेली आहे. आजपर्यंत आपण अनेक उदाहरणे पाहिलेले आहेत की जिथे सरकारची दादागिरी चाललेली आहे

‘त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे सुद्धा अधिकार पाहिजे’

याच्याबद्दल गेले काही दिवस केंद्रीय कायदामंत्री बोलतायत. राज्यसभेचे अध्यक्ष बोलतायत त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचे सुद्धा अधिकार पाहिजे. देशातील लोकशाही संपलेली आहे लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली आजचा हा जो काही निर्णय आहे तो अत्यंत अनपेक्षित आहे

‘लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर…’

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी मधल्या काळातील आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाचा आणि निकाल कोणाच्या बरोबर आहे? हे जर का केवळ आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर मग मात्र कोणी धनाड्य माणूस निवडून आलेला आमदार-खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो

मला आता असं वाटतंय की जसं न्यायाधीश नेमण्याची प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त विरोधी पक्षांना सोबत घेऊन सुरुवात करण्याची आता गरज आहे.

गद्दारांना मांडीवर घेतलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे जे धैर्य अवस्था झालेली आहे त्यांना स्वतः लढण्याची हिंमत नाहीये. मी अनेकदा त्यांना आव्हान दिलेलं आहे की, हिम्मत असेल तर निवडणुका घ्या. अगदी लोकसभा पासून महापालिका तुम्ही एकटी निवडणूक घेण्याची काय त्यांची हिम्मत झाली नाही. आता मला अशी शक्यता वाटायला लागलेले की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंधे गटाला दिलेला आहे म्हणजेच असं की कदाचित येत्या महिन्यात दोन महिन्यांमध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील महापालिकेच्या

तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं तरी त्यांनी धनुष्यबाण चोरलेला आहे. तो धनुष्यबाण कागदावरच आहे. ते चिन्ह आजही माझ्याकडे कायमचे माझ्याकडे राहणार आहे, तो तुम्हाला दाखवतोय एकूण काय की अनेकांना असं वाटलं असेल की आता शिवसेना संपली.

शिवसेना ही अशी रेसिपी नाहीये. आजपर्यंत पहिल्या दिवसापासून जेव्हा सुद्धा आमच्याकडे एक निशाणी नव्हती हा धनुष्यबाण याचा उल्लेखनी कामगिरी करतो. तसा धनुष्यबाण त्याच्यावरचा कुंकू सुद्धा आपण पाहू शकता. हा शिवसेना प्रमुखांच्या देव्हाऱ्यातला आज सुद्धा आमच्या पूजेत असलेल्या धनुष्यबाण आहे आणि याची पूजा ही माननीय शिवसेनाप्रमुखांनी स्वतःच्या हाताने केलेली आहे. या धनुष्यबाणाचा तेज ती जी काय शक्ती आहे त्याला राहणार नाही. याची मला खात्री आहे मला विश्वास आहे

असेल रावणाकडे पण धनुष्यबाण, असेल रामाकडे पण असेल, पण शेवटी विजय हा जसा रामायणमध्ये रामाचा झाला आणि शंभर कौरव एकत्र आले म्हणून त्या पांडू हरले नव्हते. सत्याचा विजय नेहमी होत आलेला आहे आणि सत्याचाच विजय हा आता आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना आणि मी तमाम अन्यविरुद्ध अन्याय जो काही झालेला आहे अत्याचार होतो, हे लोकशाही वरती अत्याचार होतोय.

मी मागे एकदा असं म्हटलं होतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. अंध दृत्तराष्ट्र नाहीये तो आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा असं वस्त्रहरण कदापी खपवून घेणार नाही. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा निकाल लागेलच आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार

शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेनाप्रमुखांचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला वाटत असेल आता तिकडे असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी तो चोर असतो. नामर्द चोरी करू शकतो म्हणून नामर्द कितीतरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. हे सत्य आहे. त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही कारण आता शुक्रवार आहे लवकरात लवकर आम्ही जाणार. तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाची पेढे खाऊ द्या.

धनुष्यबाण त्यांनी चोरण्याचा आनंद मिळू द्या. शेवटी चोर बाजाराला जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये. एकूणच सगळे बाजार होऊन गेले म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणार नाहीये म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो शिवसेना प्रेमिंनो कुठे खचू नका. मी तर कुठे खचलो नाहीये.

मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्या लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार. फक्त हिम्मत सोडू नका. जिद्द खचून देऊ नका. बस मैदानात उतरलोय. आता विजय शिवाय माघारी परतायचं नाही. एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो.

बाकी आणखीन मला जे काय बोलायचं असेल ते येथे एक दोन दिवसांमध्ये मी वाटलं तर पुन्हा बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं ही चोरी केलीय त्याला काही काळजी वाटत असेल. पण पचणार नाहीये. परत सांगतो की त्याला शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरावा लागतोय. त्याला शिवसेना हे नाव चोरावे लागले. त्याला शिवसेनेचे धनुष्यबाण चोरावा लागलेला आहे. असे चोर कधीही मतदानातून निवडून येऊ शकत नाहीत. म्हणून हे नामर्दा तुम्हाला ही चोरी वाचली असं वाटत असेल तरी ती तशी पाचणारी नाही. एवढं लक्षात ठेवा आणि जनता याचा पुरेपूर बदला कोणत्याही येणाऱ्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही

'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.