महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार, कारण…

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मानले आभार, कारण...
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 9:20 PM

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान (Bhagwan Maan) यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल आणि भगवान मान यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या एका निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.

“आजच माझ्या कानावर आलं की जे माझ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला. या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. म्हणून मी आता असलेल्या महाराष्ट्र सरकारला धन्यवाद. कारण आम्ही घेतलेल्या निर्णयांपैकी या निर्णयांना त्यांनी मंजुरी दिली. माझ्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सोबतच्या इतर पक्षाच्या सहकाऱ्यांनी देखील या निर्णयाला होकार दिलेला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यावरही उत्तर दिलं. “ते आता खूप जुने गोष्टी काढायला लागले होते. त्यांच्याकडे सगळा रेकॉर्ड असेल तो जरुर काढावा”, असं ठाकरे म्हणाले. याशिवाय फडणवीस ठाकरेंना आपले शत्रू नाहीत, असं उद्देशून म्हणाले आहेत. त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं. “आम्हीसुद्धा त्याच मानसिकतेत आहोत की, ज्या पद्धतीने ते ठाकरे कुटुंबासोबत वागत आहेत ते पाहता देशातील लोकशाही फक्त 75 वर्षे राहणार आहे का? आम्ही कधीच सुडाचं राजकारण केलेलं नाही”, असं ते म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतराला केंद्राकडून मंजुरी

औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. औरंगाबादसह उस्मानाबाद (Osmanabad) शहराचं नाव धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला. या दोन्ही शहरांच्या नव्या नावांचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला. अखेर केंद्र सरकारने दोन्ही नावांच्या नामांतरासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराला अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव असं म्हटलं जाणार आहे. सर्व शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये तसा उल्लेख केला जाईल.

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं, अशी मागणी केलेली. बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबाद शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 8 मे 1988 रोजी सभा झालेली. या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबतची मागणी केलेली. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून ही मागणी लावून धरण्यात आली होती. औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत नामांतराच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटायचं. अखेर राज्य सरकारने याबाबत निर्णय काही दिवसांपूर्वी घेतलेला. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील नामांतराला मंजुरी दिली आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.