उद्धव ठाकरे पागल हो गये है… ठाकऱ्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा
शोध बाहेर देशात लागतात. इथं का नाही लागत? व्यवसाय वाढवणं त्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. हेमा मालिनी यांचा आज आपण सत्कार केला. त्यांचा हा सत्कार सत्कारणी लावायचा असेल तर भाजपला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून द्या. विधानसभा निवडणुकीत जनतेला विकासकामे सांगा, असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. ते पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 25 डिसेंबर 2023 : राम मंदिर ही काही भाजपची प्रॉपर्टी नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे पागल हो गये है. उद्धव ठाकरे सोडल्यास राम मंदिर कोण बांधतंय हे संपूर्ण जग जाणून आहे. भाजपची सत्ता आल्यावरच राम मंदिराचं काम सुरू गेलं. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आहे. त्यामुळे त्यांना काय बोलावं हेच कळत नाही. त्याला काय अक्कल आहे. राम ही भाजपची प्रॉपर्टी नाही. राम देव आहे. ती सर्वांचीच प्रॉपर्टी आहे, अशी खोचक आणि जोरदार टीका नारायण राणे यांनी केली.
वांद्रे येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांना अटल बिहारी वाजपेयी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नारायण राणे यांच्या हस्ते हेमा मालिनी यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या सर्व्हेवरही भाष्य केलं. जनता काँग्रेस आघाडीसोबत नाही. उद्धव ठाकरे यांना विकृत बोलायला काहीच हरकत नाही. उद्धव यांच्यासोबतही जनता नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावाच नारायण राणे यांनी केला.
आम्हीच जिंकणार
कोण इंडिया आघाडी? आमचाही सर्वे झाला आहे. आम्हीच शंभर टक्के जिंकणार आहोत. पैसे देऊन करण्यात आलेल्या सर्व्हेवर आमचा विश्वास नाही, असं राणे म्हणाले.
फिटनेस कसा ठेवायचा हे शिकावं
यावेळी नारायण राणे यांनी हेमा मालिनी यांचं कौतुक केलं. हेमा मालिनी यांचं वय आता 75 आहे. हेमा मालिनी यांच्याकडून काही शिकायचं असेल तर फिटनेस कसा ठेवायचा हे शिकलं पाहिजे. सत्कार माणसाचा केला जातो. त्यांच्या गुणांचा सत्कार केला जातो. तो जाहीररित्या केला जातो. कारण बोध घेता येतो, असं राणे म्हणाले.
वाजपेयी अजातशत्रू
अटलजींच्या सोबत अनेक भेटी झाल्या. बैठकी झाल्या. परफेक्टमध्ये अटलजी परफेक्ट बसत होते. ते अजातशत्रू होते, असं राणे म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचंही कौतुक केलं. मोदींनी देशात 54 योजना आणल्या. एवढ्या योजना कोणी देऊ शकलं नाही. भारताला पाचव्या नंबरवर आणण्याचं काम मोदींनी केलं. हा अभिमान आहे. त्यांचं कर्तृत्व पुसता येणार नाही, असंही ते म्हणाले.