BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेत.

BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 10:29 PM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेत. “रुग्णालयातील रुग्णशय्यांचे (बेड्स) व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थितीच्या ऑनलाईन आढावा बैठकीत बोलत होते (Uddhav Thackeray instruct BMC to give corona report urgently in Mumbai).

‘उत्तम समन्वय ठेवा’

या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा परिस्थितीत लवकर कोरोनाचे निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल. त्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच बाधित रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त रुग्णशय्यांच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा. या माध्यमातून रुग्णांना आवश्यक सुविधा देऊन हे संकट दूर सारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.”

“मुंबईमध्ये साधारणत: 10 फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. असे असले तरी दैनंदिन रुग्णांमध्ये सुमारे 85 टक्के ही लक्षणं नसलेले बाधित रुग्ण आहेत,” असं बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी नमूद केलं.

“पुरेसे बेड उपलब्ध”

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईत एकूण 153 कोविड रुग्णालये असून त्यामध्ये सध्या 20 हजार 400 रुग्णशय्या आहेत. येत्या आठवड्यात ही संख्या 22 हजार होईल. 10 फेब्रुवारी 2021 पासून आजमितीपर्यंत 1050 आयसीयू रुग्णशय्या नव्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दैनंदिन बाधित रुग्ण संख्या आता 8 ते 10 हजारदरम्यान स्थिरावली असली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील 10 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढूनही आज 3 हजार 900 रुग्णशय्या रिक्त/उपलब्ध आहेत. मोठ्या खासगी रुग्णालयांमधून बरे होत आलेल्या आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नसलेल्या रुग्णांना स्थानांतरित करण्यासाठी निरनिराळ्या हॉटेल्स संलग्न करुन देण्यात येत आहेत.”

“रेमडिसीव्हीरबाबत प्रयत्न सुरु”

“रेमडेसीवीर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या 2 लाख मात्रा खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील 25 हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. अधिक पुरवठा लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत,” असंही इकबाल चहल यांनी नमूद केलं.

“प्राणवायू पुरवठ्यासाठी 6 समन्वय अधिकारी”

मागील आठवड्यात रुग्णवाहिकांच्या ताफ्यामध्ये 350 रुग्णवाहिका नव्याने दाखल झाल्या आहेत. त्यासोबत प्राणवायू पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी महानगरपालिकेकडून 6 समन्वय अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नेमले आहेत. तर मुंबईतील प्रत्येकी 4 विभागांमागे एक याप्रमाणे एकूण 24 प्रशासकीय विभागांसाठी 6 प्राणवायू पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत. ते तातडीच्या स्थितीत प्राणवायू उपलब्ध करुन देवू शकतील. मुंबईतील 64 नर्सिंग होममध्ये प्राणवायूचा सुयोग्य व काटकसरीने उपयोग करण्याबाबत प्रशिक्षण देण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात आली आहे,” अशीही माहिती देण्यात आली.

अवाजवी देयकांसाठी लेखा परीक्षकांची पथके

तसेच खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी देयकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 35 रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. देयक तयार होताच त्याचे स्वत:हून लेखापरीक्षण करण्यात येते.

चाचण्यांचे अहवाल लवकर मिळण्यासाठी नियोजन

कोरोना चाचणीचा अहवाल 24 तासांच्या आत देण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने अँटीजेन टेस्ट करावी. त्यात बाधित आढळले तर त्यांचे विलगीकरण करुन आरटीपीसीआर चाचणी करावी. जेणेकरुन बाधित रुग्ण वेळीच शोधता येतील व आरटीपीसीआर चाचण्यांवरील ताणही कमी होईल, अशी सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ही सूचना तातडीने अंमलात आणण्यासाठी सूचना देण्यात येतील, असं इकबाल चहल यांनी सांगितलं. यावेळी मुख्य सचिव कुंटे यांनी येत्या काळात मुंबई महानगरपालिकेला आवश्यक अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी हे सहभागी झाले होते.

हेही वाचा :

कोरोना कसा आटोक्यात येणार?; मुंबई लोकलमधून दररोज 15 ते 16 लाख लोकांचा प्रवास!

PHOTO | राज्यभर संचारबंदी लागू, कुठं सुनसान तर कुठं वर्दळ; लोकांचा प्रतिसाद कसा ?

Corona Vaccine in Mumbai : मोठी बातमी : मुंबईतील महत्वाच्या लसीकरण केंद्रावरील लस संपली, बीएमसी अधिकाऱ्याची माहिती

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray instruct BMC to give corona report urgently in Mumbai

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.