शिंदे गटाचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

चिन्ह आणि पक्षाचा वाद विकोपाला गेला असतानाच आता व्हीपच्या मुद्यावरून राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे गटाचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 4:29 PM

मुंबईः शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेण्याचा धडकाच लावला आहे. आजही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शिंदे गटाकडून व्हिपचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. शिंदे गटाकडून व्हिपचा मुद्दा उपस्थित केला गेला असला तरी उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, शिंदे गट वेगळा आहे.

त्यातच त्यांचा गट वेगळा असल्याचे मान्य केले गेले आहे. त्यामुळे शिंदे गटाचा व्ही आम्हाला लागू होणार नाही या शब्दात उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

व्हीप बजावणार असल्याचे शिंदे गटाचे प्रतोज भरत गोगावले यांच्याकडून सांगितले जात आहे मात्र ठाकरे गटाने शिंदे गटाच्या या निर्णयाला उडवू लावले आहे. त्यामुळे व्हीपच्या मुद्यावरून राजकारण आणखी तापणार असल्याचेही बोलले जात आहे.

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय  होत नाही तोपर्यंत निर्णय घेऊ नये असं स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांना व्यक्त केले  आहे. त्यामुळे आम्ही जिथे आहोत तिथेच असून ते घराच्या बाहेर गेले आहेत.

ते अपात्र होण्याची शक्यता अधिक असून आम्हाला त्यांची त्याची भीती नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर  निशाणा साधताना सांगितले की, प्रॉपर्टी आणि इतर मालमत्तांवर शिंदे गटाने हक्क सांगितला तर आम्ही निवडणूक आयोगावर केस दाखल करणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

आता चिन्ह आणि पक्षाचा वाद विकोपाला गेला असतानाच आता व्हीपच्या मुद्यावरून राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे शिंदे गटाचेा व्हीप आम्हाला चालणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मात्र व्हीप बजावणार असल्याचे सांगितले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.