‘तेव्हा माझा पाठिंबा घ्यायला लाज वाटली नाही का?’; उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला
Uddhav Thackeray Press Conference : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बंद दाराआड झालेल्या चर्चेच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे.
मुंबई : आमदार अपात्रतेच्या निकालावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप, निवडणूक आयोग यांच्यावर निशाणा साधला. सगळ्या संस्था यांच्या नोकर झाल्या असून नार्वेकर यांनी लोकशाहीच्या विरोधात निकाल दिल्याचं म्हटलं आहे. नार्वेकर यांनी 1999 च्या घटनेवरून हा निकाल दिल्याचं सांगितलं होतं. यावर ठाकरे गटाने 2013 आणि 2018 च्या कार्यकारणीचे व्हिडीओ मीडियाला दाखवले. त्यासोबतच निवडणूक आयोगाला सर्व काही दिल्याची पोचपावतीही दाखवली. यानंतर ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये थेट भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शाह माझ्याकडे आले होते. म्हणाले असं काही झालं नाही. मग काहीच झालं नव्हतं. तर माझ्याकडे कसे आला होता. माझ्या शिवसेनेचा पाठिंबा घ्यायला आले होते. पाठिंबा घ्यायला यायला लाज वाटली नाही. मी म्हणजे तुम्ही सर्व आहात. 2014 ला घेतला लोकसभेला घेतला मग माझं पाठिंब्याचं पत्र कसं घेतलं? फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद उबवलं ते कुणाच्या पाठिंब्यावर? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, मिंदे फिंदे यांना कुणी पदं दिले. मी त्यांना एबी फॉर्म दिला होता की नाही, पद दिलं होतं की नाही. घरगडी म्हणून वागवतात असं सांगता. मग एवढी शेती असलेला घरगडी. सोनाराने टोचले कान म्हणून यांना बोलावलं, लबाडाचे टोचले कान. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आदर आहे आणि विश्वासही असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागितला खर्च
19 लाख 41 हजार शंभर रुपयांच्या स्टँम्पवर शपथपत्र पुरवली होती. निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का. एक तर ते स्वीकारा आमचा हक्क आम्हाला द्या. 19 लाख 41 हजार इनटू आम्हाला द्या. हा मोठा घोटाळा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.