‘राज्यपालांना सांगतो अधिवेशन बोलवा, अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा’, उद्धव ठाकरे यांचं चॅलेंज

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्यपाल रमेश बैसे यांनी विधानसभा अध्यक्षांच्याविरोधात विशेष अधिवेशन बोलवून अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याचं आव्हान दिलं.

'राज्यपालांना सांगतो अधिवेशन बोलवा, अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा', उद्धव ठाकरे यांचं चॅलेंज
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 6:52 PM

मुंबई | 16 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत सुरुवातीला वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर भूमिका मांडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल कसा चुकीचा दिला, याबाबत असीम सरोदे यांनी विश्लेषण केलं. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील भूमिका मांडली. यावेळी त्यांनी स्क्रिनवर थेट 2014ची शिवसेनेची प्रतिनिधी सभाच दाखवली. या प्रतिनिधी सभेत मांडण्यात आलेल्या 6 ठरावांविषयी त्यांनी माहिती दिली. या प्रतिनिधीसभेबाबत अनिल परब यांनी सविस्तर माहिती दिली. शिवसेनेची घटना दुरुस्ती कधी-कधी करण्यात आली याबाबत अनिल परब यांनी माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना अधिवेशन बोलवून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याचं चॅलेंज दिलं.

“आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो. ते उच्च न्यायालयात गेले. तिकडेही त्यांना टाईमपास करायचा आहे. मूळात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षावर दिला. त्यांना सांगितलं पात्र अपात्र ठरवा. त्यांनी ठरवलं नाही. मिंधे गट कोर्टात गेला. त्यामुळे त्यांना नाराजी व्यक्त केली. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना सांगतो अधिवेशन बोलवा. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. होऊन जाऊ द्या”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. “आमचाच व्हीप लागेल. व्हीपचा अर्थ चाबूक. लाचारांच्या हाती शोभत नाही. शिवसेनाप्रमुख आणि शिवसैनिकांच्या हाती शोभतो”, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

‘पुरावा पुरावा की गाडावा?’

“गेल्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला… नाही लवादाने. लबाडाने नाही लवादाने दिला. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीचा जनता आहे. त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही आलो. देशात मतदार सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव किंवा कमी देश आहे ज्यांनी जनतेच्या चरणी संविधान अर्पण केलं आहे. सरकार कुणाचंही असलं तर जनता सर्वोच्च असली पाहिजे. हा सूर्य हा जयद्रथ. आता तरी निकाल मिळावा. न्याय मिळाला पाहिजे. पुरावा पुरावा की गाडावा?”, असा सवाल ठाकरेंनी केला.

“माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचं नाही. मीही एक पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कुणाची. मग जनतेने सांगावं कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे. शिवसेना तुम्ही विकली असाल ती काही विकावू वस्तू नाही. आज इथे शिवसैनिक आहेत. आज लाखो शिवसैनिक माझ्यासोबत कसे?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.