अपात्रतेवर आधी फैसला व्हावा, सुप्रीम कोर्टाच्या निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल नको; उद्धव ठाकरे यांची थेट मागणी

अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा. घटनातज्ज्ञांचंही तेच मत आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार असतील तर आयोग शिंदे गटाचा पक्षावरील दावा कसा मानू शकतो?

अपात्रतेवर आधी फैसला व्हावा, सुप्रीम कोर्टाच्या निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल नको; उद्धव ठाकरे यांची थेट मागणी
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 2:09 PM

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यावर आधी सुनावणी झाली पाहिजे. त्याचा निकाल आधी आला पाहिजे. त्यानंतरच निवडणूक आयोगाचा निकाल आला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने आपला निर्णय देऊ नये, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

कोंबडा आधी की अंडं हा मुद्दा या प्रकरणात आहे. 20 जूनला पक्षादेश मोडून जे पळून गेले. त्यातील कैलास पाटील आणि नितीश देशमुख हे परत आले. पळून गेलेल्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा करावा हे नीचपणाचं आहे. विकृत आहे. अपात्रतेचा निकाल आधी लावावा.

हे सुद्धा वाचा

तो प्रश्न आधी आहे. नंतर जूनमध्ये गद्दार गट कोर्टात गेला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा केला होता. त्यामुळे आधी अपात्रतेचा निर्णय झाला पाहिजे. नंतरच पक्षाबाबतचा निर्णय झाला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तोपर्यंत निकाल नको

अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा. घटनातज्ज्ञांचंही तेच मत आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार असतील तर आयोग शिंदे गटाचा पक्षावरील दावा कसा मानू शकतो? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असं आमचं मत आहे, असं ठाकरे म्हणाले.

संभ्रम दूर करण्यासाठी पत्रकार परिषद

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेण्याचं कारणही सांगितलं. गेल्या सहा सात महिन्यांपासून लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेचं काय होणार? धनुष्यबाणाचं काय होणार? पक्षाच्या नावाचं काय होणार?

शिवेसेनच्या पाठीत पोटात वार करून टेंभा मिरवणारे आहेत त्याचं काय होणार? असा लोकांमध्ये सवाल आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर व्हावा म्हणूनच मी पत्रकार परिषद घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही आमचं म्हणणं माडलं

दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 14 तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्हीकडून दावे, वाद, प्रतिवाद झाला आहे. आयोगाने 30 तारखेला दोन्ही बाजूला लिखित आदेश देण्यास सांगितले आहे.

शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही. शिवसेना एक होती आणि एकच राहील. आम्ही आमचे मुद्दे मांडले आहेत. आयुक्तांसमोर मांडले आहेत. लेखी स्वरुपात दिले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.