AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Rally Live : पहिल्यांदाच शिवसेनेच्या जनसागरासमोर आदित्य ठाकरे भाषण करणार, सर्वात मोठ्या मंचावरून काय बोलणार?

मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीही तोफ धडाडणार असल्यााची माहिती समोर आल्यापासून त्यावरूनही आता जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार असल्याने त्यामुळे शिवसैनिकांसाठी हा क्षण ऐतिहासिक असणार आहे.

Uddhav Thackeray Rally Live : पहिल्यांदाच शिवसेनेच्या जनसागरासमोर आदित्य ठाकरे भाषण करणार, सर्वात मोठ्या मंचावरून काय बोलणार?
पहिल्यांदाच शिवसेनेच्या जनसागरासमोर आदित्य ठाकरेImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 6:32 PM

मुंबई : काही वेळातच बीकेसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Rally Live) यांची हायव्होल्टेज सभा पार पडत आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर भाजप, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासहीत अनेकजण असणार आहे. मात्र या सभेतलं आणखी एक वेगळेपण समोर येतंय. ते म्हणजे या सभेत आदित्य ठाकरे हेही बोलणार आहे. आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जनसागरासमोर काय बोलणार? याची उत्सुकता शिवसैनिकांच्या मनात आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या हुंकार सभेत पक्षाचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीही तोफ धडाडणार असल्यााची माहिती समोर आल्यापासून त्यावरूनही आता जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार असल्याने त्यामुळे शिवसैनिकांसाठी हा क्षण ऐतिहासिक असणार आहे.

सभेत कोण कोण बोलणार?

या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी शिवसेनेचे अनेक बडे नेतेही भाषण करणार आहेत. त्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई,  एकनाथ शिंदे यांचीही भाषणे होणार आहेत. त्यामुळे ही सभा  वादळी होणार हे आतापासूनच स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सभेची फक्त राज्यात नाही तर देशभरात चर्चा आहे. या सभेने शिवेसनेच्या शिवसंपर्क अभियानाची सुरूवात होणार आहे. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता या सभेला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. भाजप नेत्यांनीही या सभेवरून टीकेची झोड उडवली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेने नेते जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत.

राज्यभरातून जनसागर लोटला

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांचे विचार ऐकण्यासाठी नवी मुंबईतून देखील मोठ्या संख्याने बसमध्ये बसून शिवसैनिक बीकेसीकडे पोहोचत आहेत. बीकेसीला शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी निघालेले शिवसैनिक म्हणतात पक्षप्रमुख जे आदेश देतील  त्याची अमलबजावणी आम्ही करू. तसेच कल्याणमधून महेश गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिक रवाना झाले आहेत. बईतील बीकेसी येथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून या जाहीर सभेत रेकॉर्डब्रेक गर्दी जमेल असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे पालघर मधील हजारो शिवसैनिक आज बस,  रिक्षा आणि  आपल्या खाजगी वाहनांनी मुंबईत दाखल झाले आहेत . पालघर च्या डहाणू तलासरी मोखाडा विक्रमगड जव्हार पालघर या तालुक्यांमधून हजारो शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.

हे सुद्धा वाचा

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.