‘हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद’, विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

"विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला असेल तरी आरोपी फरार व्हायला नको. कारण असं काही ठिकाणाहून काल सुद्धा मला माहिती मिळाली. कदाचित त्यांच्यात गँगवार असतील. पण काल नाशिकमध्ये ह्यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना फरार झाली अशी माझ्याकडे ऐकीव माहिती आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद', विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
विनोद तावडे
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 5:04 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारच्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांनी घेरलं. विनोद तावडे यांच्या बॅगेत 5 कोटी रुपये असल्याचा आरोप ठाकूर पिता-पुत्रांनी केला. तर विनोद तावडे यांनी संबंधित आरोप फेटाळले. विशेष म्हणजे या राड्यादरम्यान क्षितीज ठाकूर यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर पैशांचे बंडल दाखवली. या घटनेवर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा व्हिडीओ कोणी बघितला पाहिजे? निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे. काल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं डोकं आपोआप फुटलं. त्यानंतर आज पैसे वाटपाचा व्हिडीओ समोर आला असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून? कुणाच्या खिशातून जात होते? याची माहिती समोर आली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

“आता मी तुळजाभवानीला गेलो तेव्हा माझी बॅग तपासली. ह्यांच्या बॅगेतील पैसे तपासणार कोण? निवडणूक आयोगाने ह्यांच्या बॅगेची तपासणी केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘कदाचित त्यांच्यात गँगवार’

“विनोद तावडेंवर गुन्हा दाखल झाला असेल तरी आरोपी फरार व्हायला नको. कारण असं काही ठिकाणाहून काल सुद्धा मला माहिती मिळाली. कदाचित त्यांच्यात गँगवार असतील. पण काल नाशिकमध्ये ह्यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना फरार झाली अशी माझ्याकडे ऐकीव माहिती आहे. माझ्याकडे त्याचा पुरावा नाही. निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणाने कारवाई केली पाहिजे. कायदा सर्वांसाठी सारखा असेल तर तो दाखवला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“पहिले प्रथम तावडे तावडीत सापडले असतील तर त्यांनी कशाप्रकारे आतापर्यंतची सरकार पाडली आणि कशी बनवली त्याचा हा पुरावा आहे. हे कट कारस्थान घडलं असेल आणि ज्यांनी हे उघड केलं असेल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण कदाचित हे त्यांचं आपापसातील गँगवार असू शकेल. भाजपांतर्गत किंवा मिंदे आणि त्यांच्यातर्गतही असू शकेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हा नोट जिहाद आहे का?

“आता हे महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की, यांच्या योजना कशा फसव्या आहेत. एका बाजूला बहिणींना 1500 रुपये आणि दुसऱ्या बाजूला थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत, हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहेत. हा शब्द खूप चांगला आहे की, भाजप-शिंदे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे आणि जितेंगे असं काही आहे का? त्याचा छडा लागायला पाहिजे. महाराष्ट्रच या प्रकरणावर आता उद्या निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

“विनोद तावडे यांना तर पीएचडी मिळाली पाहिजे कारण त्यांनी अनेक राज्यातील सरकारे पाडली आणि भाजपचं सरकरा स्थापन केलं. त्यांच्या या कार्याचं गेल्या काही दिवसांपासून कौतुक होत आहे. त्यामागाचं गमक काय आहे त्याचा खुलासा आज झालेला आहे. हा भाजपचा नोट जिहाद आहे, पैसा बाटेंग और जितेंगे असं काहीसं आहे. यावर आता कठोर कारवाई व्हायला हवी. फक्त गुन्हा दाखल करुन गोष्ट सुटायला नको”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.