‘लाल फितीच्या कारभारामुळे….’, उद्धव ठाकरेंनी ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र लिहित सुनावलं

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन खडेबोल सुनावलं आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला जाबही विचारला आहे.

'लाल फितीच्या कारभारामुळे....', उद्धव ठाकरेंनी ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र लिहित सुनावलं
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 8:22 PM

मुंबई | 5 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळासाठी महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या नावांना परवानगी का देण्यात आलेली नाही? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. अयोध्येत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. अयोध्या विमानतळाला ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नामकरण करण्यात आलं आहे. याशिवाय आणखी काही विमानतळाच्या नामकरणाचं उदाहरण देवून उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराष्ट्रालाच का अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागतोय? असा प्रश्न विचारला आहे.

“अयोध्येतील विमानतळाचे ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. ह्या विमानतळामुळे प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातील यात्रेकरूंना अयोध्येला सहज पोहोचता येईल. त्याचप्रमाणे मोपा, गोवा येथील विमानतळाला ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांचा उल्लेख आहे. महोदय, ह्या नावांचे नामकरण स्वागतार्ह असले तरी, अत्यंत नम्रतेने आपल्या निदर्शनास आणून देणे आमचे कर्तव्य आहे की, महाराष्ट्रात मविआ सरकारने 2 विमानतळांच्या नामकरणास मान्यता दिली होती आणि केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवली होती”, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी पत्राद्वारे करुन दिली.

‘महाराष्ट्राला सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला’

“औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘श्री दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण आम्ही प्रस्तावित केले होते. आम्ही हे 2 प्रस्ताव अनुक्रमे 2020 आणि 2022 मध्ये पाठवले असताना, आम्हाला विविध स्तरांवरून सांगण्यात आले की, कोणत्याही व्यक्तींच्या नावावरून नव्हे तर विमानतळ ज्या शहरांमध्ये आहेत त्या शहरांवरुन विमानतळांचे नामकरण करण्याच्या भारत सरकारच्या धोरणामुळे हा विलंब होत आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं.

“भारतातील 2 विमानतळांना 2 व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत, हे पाहून आम्हाला खरोखर आनंद झाला आहे आणि ह्या 2 विमानतळांना लागू होणारे नियम आमच्या राज्यातील महाराष्ट्रातील 2 विमानतळांना देखील लागू होतात का? हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आम्ही विमानतळांना ज्या 2 व्यक्तींची नावे दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांना परिचयाची गरज नाही. तरीही, लाल फितीच्या कारभारामुळे होणारा विलंब चिंतेचे कारण वाटते आणि श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केले जात असल्याचे पाहून दुःखही होते. त्याचप्रमाणे श्री. दि. बा. पाटील ह्यांचेही समाजासाठी मोठे योगदान आहे. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की ह्या सुचवलेल्या 2 विमानतळांच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.