अजितदादा वारंवार पवारांना भेटणं ‘साथी’चा, तर मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला जाणं हा ‘मानसिक’ आजार; दैनिक ‘सामना’तून खवचट टीका

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीने संभ्रम वाढला आहे. देशी चाणक्य या भेटीसाठी अजित पवारांना ढकलून तर देत नाही ना? या शंकेला बळ मिळत आहे, अशी शंका आणि दावा दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

अजितदादा वारंवार पवारांना भेटणं 'साथी'चा, तर मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याला जाणं हा 'मानसिक' आजार; दैनिक 'सामना'तून खवचट टीका
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 8:24 AM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वारंवार भेटी होत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी वारंवार जात आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आली आहे. अजितदादा पवार हे वारंवार शरद पवार यांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱ्यातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात. हा महाराष्ट्राला लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारात गुप्त असे काहीच राहिले नाही, अशी खोचक आणि खवचट टीका दैनिक ‘सामना’तून करण्यात आली आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून अजितदादा यांच्या भेटीगाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावरून जोरदार टीका करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी अमित शाह पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी गुप्त गाठीभेटी घेतल्या. नेतृत्व बदलावर त्यांच्या चर्चा झाल्या. ही गुप्त बातमी फुटल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजार बळावला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या लोकांनी हा आजार गंभीरपणे घेतला पाहिजे. हा रोग राज्याला लागला आहे. त्याचे उच्चाटन लवकरात लवकर केले पाहिजे, असं सांगतानाच आता दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ला करत आहे. पण तरीही महाराष्ट्र उभा राहील. दोन पवारांची गंमतभेट आणि मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हे वैयक्तिक प्रश्न आहेत. पण महाराष्ट्र म्हणजे गंमतजंमत नाही, असा इशाराच दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

सगळ्यांच्या लहान मेंदूला त्रास

यावेळी अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची खिल्लीही उडवली आहे. मुख्यमंत्री 24 तास काम करतात असं सांगितलं जातं. पण त्यांचं काम तर कुठेच दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून मुख्यमंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्याला 24 तास काम करणे म्हणत नाहीत. मुख्यमंत्री उठसूट हेलिकॉप्टरने साताऱ्यातील दरे गावातील शेतावर आराम करायला जातात. अजित पवार सरकारमध्ये घुसल्याने शिंदे यांच्या हृदयाचे ठोके वाढले असून मन अस्थिर झाले आहेत. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्याने या सगळ्यांच्या लहान मेंदूला त्रास होऊ लागला आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

बुवाबाजीने आजार बरा होत नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात जाऊन गावठी उपचार घेत आहेत. जडीबुटी, जादूटोणा आणि बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार घेणं योग्य नाही. आरोग्य ही संपत्ती आहे, तिचं रक्षण खोक्यांनी होत नाही. मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेलं नाही. शिंदे यांना वाटतं मीच शेवटच्या श्वासपर्यंत राहील. पण अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या श्वसननलिकेत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना गुदमरल्यासारखे होत आहे, असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.