‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता?’, उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना खोचक सवाल

"सरकारचा मध्ये कार्यक्रम चालला होता की, सरकार आपल्या दारी. पण हे सरकार अदानींच्या दारी आहे. आम्ही उतरलो आहोत, धारावीतील सगळ्यांचा एफएसआय, टीडीआर अदानींना देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीय. ढगांची गरजच नाही. बिन ढगांच्या सवलींता एवढा पाऊस पाडलाय की, आणखी ढगांची गरजच नाही", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

'तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता?', उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना खोचक सवाल
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 5:26 PM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सत्ताधारी भाजप सरकरा आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सडकून टीका केली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी धारावीकर आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता?’, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना केला. “ज्याने ज्याने अदानींची सुपारी घेतली आहे त्या सुपारीबाजांना सांगू इच्छितो हा अडकित्ता लक्षात घ्या. किती मोठा अडकित्ता आहे. खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, तुमची दलाली अशी ठेचून टाकू की, दलालीचं नाव घेणार नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प चर्चेत आहे. अनेक नेते इथे आहेत. अनेक जण या प्रश्नासाठी आवाज उठवत आहे. मी त्यांना वचन दिलं होतं की, फक्त मुंबईच काय, संपूर्ण महाराष्ट्र आज धारावीत उतरवेल. त्याप्रमाणे फक्त मुंबईतली आपले कार्यकर्ते आज रस्त्यावर आलो आहेत. याचं वर्णन करण्याची गरज नाही. मी माध्यमांना विनंती करतो की, त्यांनी हे दृश्य अदानी आणि त्यांच्या बापजाद्यांना दाखवा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘यांची मस्ती वाढत चालली आहे’

“आता तुम्ही 50 खोके एकदम ओके अशी घोषणा दिली. आपली ही घोषणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली. पण आथा यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले आहेत ते बोके. यांची मस्ती वाढत चालली आहे. एकतर हे असंविधानिक सरकार आहे. यांना असं वाटतंय की, आपल्याला कुणी जाब विचारु शकत नाही. वर्षा ताई तुम्ही म्हणालात की, तुम्ही अदानींना प्रश्न विचारता तर भाजप उत्तर देता. तरी नशिब तुमचं अजून महुआ मोहित्रा नाही केलं. कारण त्यांनी त्यांना प्रश्न विचारले म्हणून थेट निलंबित करुन टाकलं. नशिब तुम्ही आता सभागृहात जात आहात”, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी यावेळी काढला.

‘तुम्ही अदानींचे बूट कशासाठी चाटत आहात?’

“सरकारचा मध्ये कार्यक्रम चालला होता की, सरकार आपल्या दारी. पण हे सरकार अदानींच्या दारी आहे. आम्ही उतरलो आहोत, धारावीतील सगळ्यांचा एफएसआय, टीडीआर अदानींना देऊन टाकला. फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीय. ढगांची गरजच नाही. बिन ढगांच्या सवलींता एवढा पाऊस पाडलाय की, आणखी ढगांची गरजच नाही. देवेंद्र आणि कंपनी म्हणतेय म्हणजे… संजय राऊत यांनी म्हटलंय भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडत आहेत की, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानींचे बूट चाटत आहात ते कशासाठी चाटत आहात?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे बघा काय म्हणाले?

“मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डरधार्जींन तुम्ही आहात. हा लढा केवळ मुंबईचा राहिलेला नाही तर हा लडा संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचा झालाय. मुंद्रांक शुल्क माफ, हे माफ, ते माफ. या सगळ्यांचा परिणाम मुंबई आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यांना वाटत असेल की सब भूमी गोपाल की, तशी सब भूमी अदानी की, तर तसं होऊ देणार नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.