मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यावर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.
“सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही त्यानंतर उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांनी वटहुकून का नाही काढला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे आधी हसले. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी फडणवीस यांचं ज्ञान तोकडं आहे, असं म्हटलं. तसेच ते मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरण्याच्या कुवतीचे नाहीत, असंही ते म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं मला वाटलं नव्हतं. वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिल्ली सरकारने का फिरवला नाही? तो केंद्राने फिरवला. हा अधिकार केंद्राचा आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी थोडंतरी समजत होतो, पण आता तर असं वाटतं की, ते बिलकूल मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरकण्याचेही कुवतीचे नाहीत”, अशी टीका उद्धव ठाकरे म्हणाले.
“वटहुकूम सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकार काढायला लागलं तर त्यांनी घटनेचा अभ्यास केलेलाच नाही. म्हणजे घटना बदलण्याचं काम जे काही करणार असं आम्ही म्हणत आहोत त्याचीच ही सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्याच्याविरोधात दिल्लीचा अधिकार केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतला तो वटहुकूम किंवा कायदा संसदेत करायला हवा. तसंच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुम्हाला मान्य नसेल तर तो निर्णय फिरवण्याचा अधिकार संसदेला आहे. त्यामुळे खास अधिवेश घेऊन तो निकाल बदलून दाखवा”, असं ठाकरे म्हणाले.
“अजित पवार यांना मी समजदार समजत होतो. माझं काही चुकलं तेव्हा हे विकेट किपर काय करत होते? मी त्यावेळेला अनेक जणांशी चर्चा करत होतो. कुठेही वकील बदलले नव्हते. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आता जे काही डोकं फोडली आहेत, मला ते जर अपश्रेय देणार असाल तर आता जे काही डोकी फोडली त्याचं श्रेय या सर्वांनी टीमवर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे.”
“एक हाफ, दोन फुल तिघांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण हा दोष त्यांच्या टीमचा आहे. आजपणे एवढं निर्घृणपणे सरकार वागलेलं माझ्या निदर्शनास आलं नव्हतं. कुणी रस्त्यावर आले तर आम्ही डोकी फोडू, माता-बघिणी बघणर नाही, वय बघणार नाही, घरात घुसून मारु, हाच संकेत त्यांनी दिला आहे. याचा प्रत्यय आपल्याला बारसूत आला होता. तिथे महिला न पाहता लाठीमार केला होता.”
“जे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी मानतं ते वारकऱ्यांवर लाठीमार करतं हे मला पटत नाही. त्यांनी आतासुद्धा जो निर्घृणपणे आत्याचार केलाय त्याची जबाबदारी कोण घेणार? कारण हे सांगणार पोलिसांनी केला, पोलीस म्हणार लाठ्यांनी केलं. मग तुम्ही लाठ्यांना बडतर्फ करणार का? आदेश कुणी दिला?”
“तो आदेश ज्याने दिला, मी जातीपातीने बघत नाही, एक फुल आणि दोन हाफ, अगदी फडणवीस वेगळे काढले तरी त्यांचं काम काय चाललेलं आहे? त्यांच्या डोळ्यादेखल त्यांना न जुमानता पोलीस वागत असतील तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावर कंट्रोल नाही. हे सरकार चालवण्याच्या कुवतीचे नाहीत. हे नालाईक आहेत, असंच त्याचा अर्थ होतो. या सरकारने राजीनामा दिला पाहिजे”
“लाठीचार्ज कुणी केला? हा प्रश्न राहतोच. बारसूत लाठीमार कुणी केला होता? अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. एक शाळकरी मुलगा शाळा सुटल्यावर घरी चालला होता. त्यालासुद्धा मारलं. त्याची जाबबादीर या सरकारची आहे. आम्ही लाठ्या मारु का? म्हणजे हे फार हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात कुणी आंदोलन केलं तर त्यांची डोकी फोडून टाकू याचा त्याचा अर्थ आहे”.