समृद्धी महामार्गावरील अपघातावरून उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर निशाणा; आतापर्यंतच्या मृतांची दिली आकडेवारी

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील अपघातावरून आता राजकारण्यांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समृद्धी महामार्ग शापित असल्याचं म्हटलं आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

समृद्धी महामार्गावरील अपघातावरून उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारवर निशाणा; आतापर्यंतच्या मृतांची दिली आकडेवारी
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 12:38 PM

मुंबई : बुलढाण्यात मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. बस पलटल्यानंतर पेटली आणि अपघातात 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची बातमी कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईक आणि जखमींची विचारपूस केली आहे. मात्र, आता या अपघातावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा महामार्ग शापित म्हटलं आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अपघातावरून शिंदे सरकारला फटकारलं आहे.

हे सुद्धा वाचा

बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत्त मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले आहेत. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवाना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

महाजन घटनास्थळी

ज्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधील पिंपळखुटा येथे अपघात झाला, तिथे गिरीश महाजन यांनी जाऊन पाहणी केली. महाजन यांनी आजचे जामनेर मतदारसंघातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. महाजन यांनी जखमींना भेटून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. बसच्या टाकीचा स्फोट झाला. त्यामुळे आग लागली आणि 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकांनी समृद्धी महामार्गावरून जाताना वेग मर्यादा पाळली पाहिजे. मालकानेही काळजी घेतली पाहिजे. समृद्धी मार्गावरून जाताना टायरही तपासले पाहिजे, असं सांगतानाच चालकाला डुलकी लागल्यानेच हा स्फोट झाल्याचं त्यांनी सांगितलं.

अमित शाह यांच्याकडून शोक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुलढाण्यातील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेला रस्ते अपघात विदारक आहे. या दु:खाच्या प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती माझी तीव्र संवेदना आहे. जखमींवर प्रशासनाकडून तातडीने उपचार केले जात आहेत. त्यांनी लवकर बरे व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असं अमित शाह म्हणाले.

सूचना केल्या होत्या

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बुलढाणा अपघातावर शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांचा शोक संदेश

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या बस दुर्घटनेचं वृत्त अत्यंत दु:खद आहे. या कठिण काळात मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे ही आशा करतो, अशी शोक भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

आरटीओ विभागावर टीका

महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बुलढाणा येथील अपघातावर दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदतीचे घोषणा करण्यात आली आहे. आरटीओचे काम दुर्दैवाने ऑफिसमध्ये बसूनच चालते, असं म्हणत विखेपाटील यांनी आरटीओ विभागावर सडकून टीका केली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.