मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जात नाही; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मी लोकांमध्ये जातो. ग्रामीण भागात माझ्यासभेत शेतकरीच असतात. महाविकास आघाडीने जी कर्जमुक्ती केली ती मिळाली की नाही हे मी त्यांना विचारतो. त्यांना जाहीरपणे विचारतो. चॅनल समोर विचारतो. हे घटनाबाह्य सरकार आलं. त्यांची मदत पोहोचलेलीच नाही. कर्जमाफी जाऊ द्या. कर्जाचा डोंगरच आहे. सरकारचा नाकर्तेपणा सांगायला गेलो तर रात्र जाईल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जात नाही; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 7:19 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 3 मार्च 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही मणिपूरला गेले नाहीत. लक्षद्वीपला जाऊन ते समुद्रात डुबकी घेतात. द्वारकेत खोल समुद्रात गेले. मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा जोरदार हल्ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चढवला आहे. मोदी सरकारचा कारभार नाहीये, तो फक्त भार आहे. केवळ रामनामाचा जप करू नका. रामराज्य आणा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

आमदार कपिल पाटील यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. या निमित्ताने धारावीत एका सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. एकच प्रोडक्ट कितीवेळा लॉन्च करणार? किती वेळा घासलं तरी त्यातून काय बाहेर पडणार? मोदींशिवाय भाजपकडे कोण पर्याय आहे? आम्ही मोदींविरोधात एकत्र आलो नाही. आम्ही हुकूमशाही विरोधात आहोत. हुकूमशाहीला एकच पर्याय म्हणजे लोकशाही. आम्ही देशभक्त म्हणून एकत्र आलो आहोत. निवडणुकीपुरती जातपात बाजूला ठेवा. देशाला वाचवा. देश टिकला तर आपण धर्म टिकवू शकतो. देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे. डोळ्यासमोर देश ठेवा, असं माझे आजोबा सांगायचे. आशीर्वाद द्यायला देव पाहिजे. पण हे देव डोळ्यासमोर ठेवताय आणि देश कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

थडगं बांधल्याशिवाय राहणार नाही

मी लढाईला मैदानात उतरलो आहे. तुम्ही सर्व सोबत आहात. ही लढाई एकट्याची नाही. मला पंतप्रधान व्हायचंय म्हणून नाही. ही भावी पिढ्यांची लढाई आहे. तुमच्या पिढ्या देशात राहणार आहेत. त्या लोकशाहीने राहणार की हुकूमशाहीने राहणार आहे हे ठरवणारी ही लढाई आहे. हुकूमशाहीचं थडगं शिवरायांचा महाराष्ट्र बांधल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

ईव्हीएम विरोधात आक्रोश

रोजगार कुठे आहे? जिथे जातो तिथे असंतोष आहे. शेतकरी, कामगार आणि विद्यार्थी आक्रोश करत आहेत. सर्वांच्या मनात ईव्हीएमची काळजी वाटत आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. ईव्हीएम घोटाळा करून बघाच. देशभर आक्रोश आहे, असं ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.