‘नवाज शरीफांचा केक खाल्ला, मोदींचा राजीनामा का नाही घेतला?’; उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल

उद्धव ठाकरे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. 'टीव्ही 9 मराठी'चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाचं उत्तर देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

'नवाज शरीफांचा केक खाल्ला, मोदींचा राजीनामा का नाही घेतला?'; उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 5:35 PM

“या देशातील सर्व मुसलमान गुन्हेगार आहेत, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याचं एक वाक्य दाखवा. त्यांनी सांगितलं. देश प्रेमी आणि देशद्रोही. नवाब मलिकांबाबतची भूमिका जाहीर करा. अजितदादांनी अधिकृत उमेदवार जाहीर केला. हे काय आहे? का कारवाई करत नाही? मोदींनी नवाज शरीफचा केक खाल्ला तर त्यांना पक्षातून का काढून टाकलं नाही. त्यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा का नाही घेतला? देशाच्या दुश्मनाचा केक खाल्ला म्हणून त्यांना पक्षातून काढलं का नाही?”, असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बाळासाहेब ठाकरे गेल्यावर म्हणाले, मैं उद्धव जी से सल्लामसलत करतो. आता म्हणतात उद्धव ठाकरे नकली संतान आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आम्ही कलम ३७० मागे घेण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. त्यांनी महाभृंगराज तेल लावून स्मरणशक्ती वाढवावी. रोजगार, शेतकरी आत्महत्या आणि इतर गोष्टीसाठी ३७०चा कलमचा संबंध काय. मोदी आणि शहा नव्हते तेव्हा काश्मिरी पंडितांना बाळासाहेबांनी आश्रय दिला होता. बाळासाहेब एकमेव व्यक्ती होते. राम मंदिर बांधताना आम्ही सोबत होता. तुम्ही म्हणाला विटा जमवा. बाबरी पडल्यावर हातभर शेपट्या गेल्या होत्या. ते काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत?”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘हा सत्ता जिहाद आहे’

“हे चंद्राबाबूंसोबत का बसले? नितीश कुमार सोबत बसले. ते संघ मुक्त भारत म्हणाले होते. मुफ्ती मोहम्मद सईद सोबत बसले. का बसले? हा सत्ता जिहाद आहे. यांचा हा सत्ता जिहाद आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “कट्टर हिंदू असेल तर चंद्राबाबूचा जाहीरनामा मान्य आहे का नाही. नवाब शरीफचा केक का खाल्ला ते सांगावं. मोहन भागवत जामा मशिदीत का गेले ते सांगा. १० वर्ष दिलं. त्यांनी काय दिलं देशाला,. गळकं राम मंदिर, गळकी संसद, तडे जाणारे रस्ते, उंदराच्या लेंड्या असणाऱ्या आनंदाचा शिधा दिला. १० वर्षात कोंबडी अंड उबवतं यांनी काय दिलं. शिक्षणाचं काय. पैसे नाहीत म्हणून मुलं शिक्षण सोडत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.