काळजाचा जवळचा व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेत चालला, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे आमदार रवींद्र वायकर हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. वायकर हे ठाकरेंचे विश्वासातले नेते होते.

काळजाचा जवळचा व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेत चालला, ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 8:09 PM

मुंबई | 10 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते आज शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम आज वर्षा बंगला परिसरात पार पडत आहे. जवळपास दीड हजार जण या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यांनी आज गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनसंवाद कार्यक्रमात रवींद्र वायकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजपवरही टीका केली.

“काहीजण आजसुद्धा जात आहेत. जाऊद्या. मी काल म्हटलं, मी काल जोगेश्वरीच्या शाखा भेटीत एक प्रश्न विचारला होता, तोच तुम्हालाही विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्ष होऊन गेले. पण साडेतीनशे वर्षांनंतरही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अण्णाजी पंत यांची नावं घेतल्यानंतर आपण त्यांना काय बोलतो? ते साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दार शिक्का पुसू शकले नाहीत तर आता जे गद्दारी करत आहेत त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी खंडोजी खोपडेची अवलाद आहे की…’

“प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी खंडोजी खोपडेची अवलाद आहे की, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांचा मी वंशज आहे हे आपण ठरवायचं आहे. जे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळचे औलाद आहेत, तिकडे मिंधे बसलाय. जा त्याच्या दाढीखाली. जाऊ शकता. कारण तो सुद्धा तीच औलाद आहे. गद्दार म्हटल्यावर गद्दारच”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘आता जे काही चालले आहेत..’

“आता जे काही चालले आहेत, त्यांचं राजकीय आयुष्य, मी आता काही बोलत नाही. आता होऊ दे. त्यानंतर आपण बोलू. पण तूर्त तुम्ही सगळे जमलेले आहात. मी काल चार विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर तिकडे खासदार म्हणून कुणाच्या नावाची घोषणा केली? तुम्ही जबाबदारी घेणार? समोर कुणीही असो, मला नुसता विजय नको, डिपॉजिट जप्त करुन विजय पाहिजे. हा लढा निष्ठावान विरुद्ध गद्दार असा आहे. एका बाजूला देशभक्त आणि दुसऱ्या बाजूला द्वेषभक्त आहेत. असा हा लढा आहे. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असा हा लढा आहे. मला असा कुणीही नकोय की, उद्या आपण जिंकल्यानंतर असं म्हणेल की, तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे. अरे जा तू पण जातो. तुला पण आडवा करतो. एवढी ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. हुकूमशाही गाढून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंची भाजपला शिवीगाळ

“शिवसेनेचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं हिंदुत्वा आहे आणि भा*** पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक आहे. मी आज सर्व जात-पातच्या लोकांना आवाहन करतोय की, आपले धर्म, जात बाजूला ठेवून हा देश हाच माझा धर्म आणि देशाच्या लोकशाही रक्षणासाठी आपण सगळे एकत्र येऊयात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी या वक्तव्यातून भाजपला शिवीगाळ केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.