Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडद्यामागे हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालाचाली घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा आपापसात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरतोय. पण जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मुंबईत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडलेली बघायला मिळत आहे. असं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पडद्यामागे हालचाली वाढल्या, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, सूत्रांकडून महत्त्वाची बातमी
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 4:58 PM

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 1 जानेवारी 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे. हे वर्ष निवडणुकींच्या रणधुमाळीचं असणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झालेला बघायला मिळतोय. असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात जागावाटपावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जागावाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंडिया आघाडीचं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागावाटप कसं असेल, या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे मुंबईत तर काँग्रेस आणि ठाकरे गटात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळालं. अखेर जागावाटपाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना काय सांगितलं?

जागावाटपाबाबत आमचं मतभेद नाही, पण भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. तसेच भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे, अशीदेखील भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. उद्धव ठाकरेंचा लवकरच दिल्ली दौरा होणार आहे. या दिल्ली दौऱ्यात जागावाटपावर चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इंडिया आघाडीची या महिन्यामध्ये देखील बैठक पार पडली होती. पण जागावाटपाबाबत आणखी एक बैठक दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत जागा कशाप्रकारे लढायच्या याबाबत चर्चा होणार आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी यांच्यात फोनवर संभाषण झालं आहे. या जागावाटपाकडे सत्ताधारी पक्षांचं देखील लक्ष असणार आहे. सत्ताधारी पक्ष इंडिया आघाडीला कमकुवत करण्यासाठी एकही संधी सोडणार नाहीत. त्यामुळे इंडिआ आघाडीचं जागावाटप देशासाठी विशेष असणार आहे.

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.