आतली बातमी, ‘चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा’, ‘त्या’ चर्चेवेळी ठाकरेंचं मोठं वक्तव्य

"चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा", असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं. "ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र नको", असंही ठाकरे म्हणाले आहेत.

आतली बातमी, 'चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा', 'त्या' चर्चेवेळी ठाकरेंचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 7:01 PM

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा चेहरा नेमका कोण असेल? याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे. असं असताना आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याचबाबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रचाराआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हे ठरवण्याबाबत उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची आतली बातमी समोर येत आहे. खासदार संजय राऊत यांनी याआधीच मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठाकरे 2.0 सरकार असेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी याआधी केलं आहे. पण त्यास महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता उद्धव ठाकरे यांची भूमिका समोर आली आहे.

“चार भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केलं. “ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री बनेल हे सूत्र नको”, असंही ठाकरे म्हणाले आहेत. “महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपैकी कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री करा. मला ते मान्य असेल. मात्र चेहरा जाहीर करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रामुळे एकमेकांच्या जागा पडल्या जातील. युतीत तेच झालं होतं. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नको”, असं उद्धव ठाकरे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनीसुद्धा अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितली महत्त्वाची माहिती

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील औपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कुणाला कौल मिळेल हे आत्ताच सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीत मविआला शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान मिळालं नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील मतदान मविआला झालं”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“लोकसभेत एससी समाज, मुस्लिमांचं मतदान मविआला झालं. पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला राहील. मी स्वत: निवडणूक लढणार नाही. अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत अजून निर्णय नाही. विदर्भात लवकरच संघटनात्मक बदल करणार. नव्या चेहऱ्यांना संधी देणार”, अशी माहिती राज ठाकरेंनी अनौपचारिक चर्चांमध्ये पत्रकारांना दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.