उद्धव ठाकरे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणारच, पण कुठे?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं की नाही? या मुद्द्यावरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. अखेर या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्टीकरण दिलं आहे. अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, याचा आनंद होत आहे. पण 22 जानेवारीला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाहीत तर नाशिकमधील राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

उद्धव ठाकरे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणारच, पण कुठे?
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 3:56 PM

मुंबई | 6 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांचा जयंतीचा दिवस शिवसैनिकांकडून ‘ममता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ममता दिवसाच्या निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता ठाकरे गटाचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने आले. उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्याकरिता छत्रपती शिवाजी पार्क येथे आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना आलं का? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंनी 22 जानेवारीला आपण नाशिकच्या पंचवटीत गोदातीरी महाआरती करणार असल्याची माहिती दिली.

“6 जानेवारी हा मासाहेबांचा जन्मदिवस असतो. त्या निमित्ताने मी दरवर्षी अभिवादन करण्यासाठी इथे येत असतो. 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस, यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानात शिवसेनेची जाहीर सभा देखील होणार आहे. 25 वर्ष ज्याच्यासाठी इतका संघर्ष करावा लागला त्या राम मंदिराचे लोकार्पण होत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकमध्ये राम मंदिरात दर्शनाला जाणार

“नाशिकमधील देखील एक रामाचं मंदिर आहे. ज्याच्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम आमचा सुद्धा आहे, माझा सुद्धा आहे. हे सांगण्यासाठी त्यांना हा संघर्ष करावा लागला होता. त्या काळाराम मंदिर येथे जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेऊ. आम्ही 22 जानेवारीला काळाराम मंदिरात संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमरास दर्शनासाठी जाऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“प्रभू रामचंद्र हे पंचवटीला देखील काही काळ वास्तव्यास होते, त्या गोदातीरी महाआरती देखील आम्ही करणार आहोत. 22 जानेवारीला अयोध्येला कोण जाणार, कोण येणार यात मला पडायचं नाही. कारण तो दिवस आम्हाला अभिमानाचा आणि अस्मितेचा दिवस आहे. राम मंदिराचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नयेत, आम्हाला देखील नंतर ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आम्ही रामाच्या दर्शनाला जाऊ. मात्र तोपर्यंत मानपाण्याचा कार्यक्रम बाजूला ठेवायला हवा”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.