मशाल चिन्ह आणि पक्षाचं नाव फक्त पुण्यातील पोटनिडणुकीपर्यंतच वापरता येणार, कारण काय?; ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार?
ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे.

मुंबई : ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. 26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला 26 फेब्रुवारीनंतर हे चिन्ह वापरता येणार नाही. तशी ऑर्डरच निवडणूक आयोगाने काढली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.