शरद पवार यांचे उद्धव ठाकरे यांच्यावरील भाष्य, उद्धव ठाकरे यांनी दिले हे उत्तर

मी वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे यांची प्रकृती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती.

शरद पवार यांचे उद्धव ठाकरे यांच्यावरील भाष्य, उद्धव ठाकरे यांनी दिले हे उत्तर
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 10:47 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीतून उद्धव ठाकरे यांच्यावर परखड भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांचे फक्त दोनदा मंत्रालयात जाणे हे पचनी पडणारे नव्हते, असं पवार म्हणाले. पवारांच्या पुस्तकांतील रोखठोक विधानावर उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर दिलंय. ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. याच्या पलीकडे मी काही बोलणे योग्य नाही. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी त्यांना त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटत होतो.

माझ्या मतावर मी ठाम आहे. तूर्त कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला तडा जाणार नाही, याची मी काळजी घेईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केली. तो कार्यक्रम लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचा होता. शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे हे दोनदा मंत्रालयात जाणे हे फारस आमच्या पचनी पडणार नव्हतं. रश्मी ठाकरे यांच्याशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचे वर्तमान समजत होतं. मी वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे यांची प्रकृती. त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती.

राज्यातल्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी हवी. काय घडतंय यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार, आज काय पाऊलं उचलली पाहिजे. ते ठरवायचं राजकीय चातुर्य हवं. या सगळ्याचं बाबतीत आम्हाला कमरता जाणवत होती.

अनुभव नसल्यानं हे सर्व घडत होतं. तरीही ते टाळता आलं असतं. संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, नेत्यांचा कार्यकर्त्यावर असतो तेवढाच अधिकारी कार्यकर्त्यांचा नेत्यावर असतो. त्यामुळे सर्वांच्या हिताचे शरद पवार निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला कसा देणार. आणि दिलेला सल्ला पचनी पडला नाही तर काय करू.

यावर संजय राऊत म्हणाले, या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे हे एक मुलाखत सामनाला देत आहेत. त्यावेळी ठाकरे हे त्यांच्याविषयी असलेल्या भाष्यावर उत्तर देतील. त्यामुळे उद्धव ठाकरे आता थेट काय उत्तर देणार हे लवकरच कळेल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.