सर्वोच्च न्यायालयही चुकू शकतं, ‘त्या’ निकालावरून घटनातज्ज्ञ बापट यांनी दिले दाखले; लार्जर घटनापीठ सुधारणा करणार?

नबाम रेबिया हा वेगळा निकाल आहे. तो स्वीकारला तरी वेगळे मुद्दे उपस्थित होतात. नाही स्वीकारला तरी वेगळे मुद्दे होऊ शकतात. नबाम रेबियाचा उपयोग आणि दुरुपयोग राजकीय पक्ष घेऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाला वाटत आहे.

सर्वोच्च न्यायालयही चुकू शकतं, 'त्या' निकालावरून घटनातज्ज्ञ बापट यांनी दिले दाखले; लार्जर घटनापीठ सुधारणा करणार?
ulhas bapatImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 2:55 PM

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला आहे. आता हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे सर्वोच्च न्यायालय सोपवणार की थेट निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. यावेळी नबाम रेबिया आणि किहेतो प्रकरणाचा वारंवार उल्लेख करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणानुसारच कोर्ट निकाल देणार की हे प्रकरण लार्जर बेंचकडे गेल्यास लार्जर बेंच नबाम रेबिया आणि किहेतो प्रकरणाचा फेरविचार करणार का? त्यात सुधारणा करून नव्याने निकाल देणार का? याकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

या संपूर्ण घटनाक्रम आणि कोर्टातील वकिलांच्या युक्तिवादावर ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोर्टात वारंवार नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख झाला. त्यानुसार कोर्ट निर्णय देणार की नबाम रेबिया प्रकरणातील निकालात सुधारणा करणार? याबाबत उल्हास बापट यांना विचारण्यात आले.

हे सुद्धा वाचा

त्यावर उल्हास बापट यांनी आपली प्रतिक्रिया देतानाच सर्वोच्च न्यायालयाने आपले आधीचे निर्णय कसे फिरवले याचे दाखले दिले. सर्वोच्च न्यायालय चुकू शकतं. ते चूकत नाही असं नाही. गोलकनाथ केसचा निकाल पुढे 13 जणांच्या घटनापीठाने बदलला. आणीबाणीत जगण्याचा अधिकार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तोही निकाल बदलला. तसे आधीचे निर्णय कोट केले जातात. त्यातील काही चुका सुधारून सात न्यायाधीशांचं बेंच सुधारून तो निर्णय संपूर्ण देशाला लागू करतील, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.

नैतिकतेला धरून राजीनामा

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा राजकीय नैतिकतेला धरून दिला. त्याच्याशी कायदेशीर बाबींचा काहीच संबंध नाही. 16 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले ते अपात्र झाले की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आमदार अपात्र होणार या अपेक्षेपोटी आधीच अविश्वास ठराव मांडला तर अध्यक्षांचा अपात्र करण्याचा अधिकार जातो.

यावर कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे तुम्ही बोलत आहात, असं विधान कपिल सिब्बल यांनी केलं. ते करेक्ट होतं, असंही उल्हास बापट यांनी सांगितलं.

कोर्टाकडून मूलभूत प्रश्न उपस्थित

यावेळी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही आजच्या सुनावणीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही गटाकडून प्रदीर्घ युक्तिवाद करण्यात आला. अनेक तोंडी प्रश्न विचारले. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. नबाम रेबियाचा जो अधिकार सांगितला जातो त्यावर कोर्टाने काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत.

नबाम रेबिया हा वेगळा निकाल आहे. तो स्वीकारला तरी वेगळे मुद्दे उपस्थित होतात. नाही स्वीकारला तरी वेगळे मुद्दे होऊ शकतात. नबाम रेबियाचा उपयोग आणि दुरुपयोग राजकीय पक्ष घेऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाला वाटत आहे, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

कोर्ट काही निर्णय घेईल

नबाम रेबियाच्या निकालात काही बदल सूचवायचे की त्याचा पुनर्विचार करायचा? त्यासाठी सात न्यायाधीशांचं घटनापीठ तयार करायचं का? हे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. त्यावर कोर्ट काही निर्णय घेऊ शकतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.