Ulhasnagar : डबक्यात पोहायला गेला अन् शॉक लागला, लहानग्याचा मृत्यू, अख्खं उल्हासनगर हळहळलं…
Child Death : पोहण्यासाठी गेलेल्या एका लहानग्याला विजेचा शॉका लागून मृत्यू झाला आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक दुख:द घटना घडली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या एका लहानग्याला विजेचा शॉका लागून मृत्यू झाला आहे. कॅम्प क्रमांक चार येथील व्हीनस चौकात असलेल्या कारंज्याच्या डब्यात होण्यासाठी आलेल्या एका मुलाचा शॉक लागून मृत्यू (Child Death) झाला आहे. ही घटना काल (शुक्रवारी) संध्याकाळी आठ वाजता घडली आहे. इंदिरा गांधी मार्केट परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन परिसरात कमल कुंज नावाची इमारत असून या इमारतीत काम करणारे दीपक परिवार यांचा नऊ वर्षाचा मुलगा विनोद हा त्याच्या दोन मित्रांबरोबर उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे असलेल्या व्हीनस चौकात उल्हासनगर महानगरपालिकेने लावलेल्या कारंज्याच्या डबक्यात पोहायला आले होते.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन परिसरात कमल कुंज नावाची इमारत असून या इमारतीत काम करणारे दीपक परिवार यांचा नऊ वर्षाचा मुलगा विनोद हा त्याच्या दोन मित्रांबरोबर उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे असलेल्या व्हीनस चौकात उल्हासनगर महानगरपालिकेने लावलेल्या कारंज्याच्या डबक्यात पोहायला आले होते. अंघोळ करून झाल्यानंतर तीन मुलं घरी जाण्यास निघाली. विनोद परिवार या मुलाचा हात विजेच्या पोलाला लागला,या पोला विद्युत प्रवाह असल्याने विनोद शॉक लागुण जागीच पडला,या येळी स्थानिकांनी विनोद ला नजीक च्या रुग्णालयात घेऊन गेले असता विनोद ला डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले, या घटनेने विनोद राहत असलेल्या इंदिरा गांधी भाजी मार्केट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उल्हासनगरमध्ये एक दुख:द घटना घडली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या एका लहानग्याला विजेचा शॉका लागून मृत्यू झाला आहे. कॅम्प क्रमांक चार येथील व्हीनस चौकात असलेल्या कारंज्याच्या डब्यात होण्यासाठी आलेल्या एका मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. ही घटना काल (शुक्रवारी) संध्याकाळी आठ वाजता घडली आहे. इंदिरा गांधी मार्केट परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.