शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही; राणेंची जोरदार बॅटिंग
लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला लगावताना कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. त्यांचं काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला.
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडे दररोजच्या वापरातील वस्तू हजारो-लाखो रुपयांच्या आहेत, असं म्हणत वस्तूंच्या किंमतीच मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्या होत्या. यावरुनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुफानी बॅटिंग केली. लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला राणेंनी मलिक यांना लगावला.
नवाब मलिक यांनी 2 नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून इतके पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता. यावेळी मलिकांनी वानखेडे 50 हजारांटे शर्ट पँट वापरतात, असं म्हटलं होतं. याच सगळ्या प्रकरणावर राणेंना प्रश्न विचारला असता राणेंनी मलिकांवर टोलेबाजी केली.
लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?
लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला लगावताना कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. त्यांचं काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला.
तुमचं काढलं तर महागात पडेल, राणेंचा मलिकांना इशारा
मलिक काहीही बोलतात. रोज उठसूठ आरोप करत आहेत. वानखेंडेवर त्यांनी आरोप केले आहेत. मला म्हणायचंय, दुसऱ्यांचे पँट शर्ट पाहण्यासाठी ते लोकांच्या बेडरुममध्ये जाताच कशाला, मला त्यांना सांगायचंय की दरा जपून राहा. तुमचं काढलं तर महागात पडेल, असा इशाराही त्यांनी राणेंनी मलिकांनी दिला.
शर्ट पँट 50 हजारांचे, शूज 2 लाखांचे, घड्याळ 30 लाखांचं, मलिकांचे वानखेडेंवर आरोप काय
तुम्ही समीर वानखेडेंचे फोटोज बघा. त्यांच्या पायातले बूट पाहा. दोन-दोन लाखांचे बूट वापरतात. ते घालत असलेले शर्ट ज्याची किंमत 50 हजारांहून जास्त आहे. टी शर्ट तुम्ही पाहिले तर ज्याची किंमत 30 हजारांपासून सुरु होते. मनगटावरचे लाखो रुपयांचे घड्याळ आहेत. 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतची घड्याळं ते वापरत आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्याचं हे साधं राहणीमान आहे का?, असा सवाल करताना मलिकांनी वानखेडेंची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.
वानखेडेंनी मोदींच्या पुढे एक पाऊल टाकलं
समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहे ती, त्यांचा पेहराव आणि राहणीमान जर पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून पुढे गेल्याचा टोमणा नवाब मलिकांनी मारला. इतकंच नाही तर समीर वानखेडे वापरत असलेले कपडे, बूट आणि मनगटावरचं घड्याळांच्या किमती सांगून त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले.
(Union Minister narayan Rane Attacked Nawab malik Over Sameer Wankhede)
हे ही वाचा :
दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी
तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल, तेव्हा बोंबलू नका; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल