नारायण राणे यांचा जबाब पोलिस 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राणे यांचा जबाब नाशिक पोलिस (Nashik Police) येत्या 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार आहेत
नाशिकः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राणे यांचा जबाब नाशिक पोलिस (Nashik Police) येत्या 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन नोंदविणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. (Union Minister Narayan Rane’s offensive statement about Chief Minister Uddhav Thackeray, Nashik Police will record Rane’s online reply on September 25)
राणे यांनी एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिक पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे यांना अटक झाली. त्यांना महाड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले होते. राणे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर पर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश राज्य सरकारला दिले होते. यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे 2 सप्टेंबर रोजी उपस्थित राहता येणार नसल्याचे पत्र राणे यांच्या वकिलांनी नाशिक पोलिसांना पाठविले होते. नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती दिली.
विविध ठिकाणी गुन्हा दाखल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती, अशी भाषा केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. या वक्तव्याचा निषेध करत युवासेना आणि शिवसेनेने मुंबईतील नारायण राणे यांच्या घरासमोर वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात जोरदार निर्देशने केली होती. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणीही गुन्हा दाखल झाला होता.
तूर्तास वादळ थंड केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना आणि युवासेना आक्रमक झाली होती. त्यांच्या वक्त्वव्याचा निषेध करत राज्यभर आंदोलने करण्यात आली. या प्रकरणावर नारायण राणे यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर म्हणणे मांडले. येत्या काळात शिवसेनेची प्रकरणे चव्हाट्यावर आणू, असा इशारा दिला होता. मात्र, तूर्तास तरी हे प्रकरण शांत झाले आहे. आगामी काळात राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय खडाजंगी पाहायला मिळू शकते.
नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वकिलांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 25 सप्टेंबर रोजी राणे यांचा ऑनलाइन जबाब नोंदविला जाणार आहे. – दीपक पांडेय, पोलिस आयुक्त, नाशिक (Union Minister Narayan Rane’s offensive statement about Chief Minister Uddhav Thackeray, Nashik Police will record Rane’s online reply on September 25)
इतर बातम्याः
मुंबईसाठी गुड न्यूज! अप्पर वैतरणा भरले, मायानगरीचा पाणीप्रश्न मिटला!!
नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर, 10 ग्रॅममागे 47500; चांदी किलोमागे 66200 रुपयांवर