VIDEO | कोरोनापासून वाचण्यासाठी भन्नाट युक्ती, व्हिडीओ पाहून लोकांच्या मजेदार कमेंट्स
एका माणसाने शक्कल लढवून सोशल डिस्टन्सिंगसाठी एक नामी युक्ती वापरली आहे. आगळ्यावेगळ्या सोशल डिस्टन्सिंगचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Unique idea for prevent from Corona, funny comments from people watching the video)

मुंबई : कोरोनाने जगभरात उच्छाद मांडला आहे. रोज लाखो नवे कोरोना रुग्ण आढळत असून कित्येकांनी प्राण गमावले आहे. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालण करणे गरजेचे असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे हा एक नामी उपाय ठरतोय. याच पार्श्वभूमीवर सध्या एका वेगळ्याच सोशल डिस्टन्सिंगचा प्रकार समोर आला आहे. एका माणसाने शक्कल लढवून सोशल डिस्टन्सिंगसाठी एक नामी युक्ती वापरली आहे. आगळ्यावेगळ्या सोशल डिस्टन्सिंगचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू फुटलं आहे. (Unique idea for prevent from Corona, funny comments from people watching the video)
प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी या व्हिडीओला आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलंय. व्हिडीओला त्यांनी #CoronaInnovation असं समर्पक कॅप्शन दिलंय. व्हिडीओमध्ये कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून व्हिडीओतील व्यक्तीने स्वत:ला एका प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये संरक्षित करुन घेतलंय. व्हिडीओतील व्यक्तीच्या चारही बाजूने प्लास्टिकचे पारदर्शक कव्हर दिसत आहे. या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये सुरक्षित राहून हा व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवास करतोय. डोळ्यांवर काळा चस्मा घालून तो मस्तपैकी आपल्या मोबाईलमध्ये पाहतोय. प्लास्टिकच्या कव्हरमध्ये सुरक्षित असल्यामुळे व्हिडीओतील व्यक्ती निश्चिंत असल्याचे दिसतेय. त्याने सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनापासून बचाव करण्याासाठी वापरलेल्या आगळ्यावेगळ्या डोकॅलिटीला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर काहींना हसू फुटलंय.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओला अनेकांनी लाईक करुन आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरसुद्धा केलं आहे. एका नेटकऱ्याने अशा प्रकारचे संरक्षण पाहून कोरोना जवळसुद्धा येणार नाही, अशी मजेदार कमेंट केली आहे. तर एकाने या व्हिडीओला पाहून प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांची आठवण आली, अशी खोडकरपणे कमेंट केली आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 18 लाख नेटकऱ्यांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडीओला पसंद केले आहे. (Unique idea for prevent from Corona, funny comments from people watching the video)
Social distancing #CoronaInnovation pic.twitter.com/s7NyqHbF8i
— Harsh Goenka (@hvgoenka) May 15, 2021
इतर बातम्या
समुद्रात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन, भारतीय नौदलानं जहाजातील लोकांना बाहेर काढलं