AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत निनावी लेटरबॉम्बने खळबळ, प्रशासनासह कंत्राटदारांची झोप उडवणाऱ्या पत्रात काय?

देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेत एका निनावी लेटरबॉम्बने खळबळ उडाली आहे. निनावी लेटर आल्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडवली आहे. Unknown Person wrote letter to BMC

मुंबई महापालिकेत निनावी लेटरबॉम्बने खळबळ, प्रशासनासह कंत्राटदारांची झोप उडवणाऱ्या पत्रात काय?
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 10:43 AM

मुंबई: देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्राने कंत्राटदारांची झोप उडवली. या निनावी पत्राद्वारे कंत्राटदारांची हातचलाखी उघड करण्यात आली आहे. सॅप प्रणालीमध्ये हस्तक्षेप करत काही मोजक्या कंत्राटदारांना मदत करत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. काही मोजक्याच कंत्राट कंपनींचा उल्लेख यात करण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे आयटीचे कर्मचारी, सॅप कंत्राट कंपनीचे कामगार आणि कंत्राटदार यांच्यामधील छुपी कार्यपध्दती बाहेर आणण्याचा प्रयत्न करत या पत्राद्वारे चौकशीची मागणी तक्रारदाराने केली आहे. असे असले तरी या निनावी पत्राची दखल प्रशासन किती घेते, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. परंतु कुठे तरी या पत्राने महापालिका प्रशासनाला विचार करायला भाग पाडले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. (Unknown Person wrote letter to BMC and Political Parties over irregularities in SAP System )

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या कार्यालयात २8 जानेवारी रोजी एक निनावी पत्र आले असून या पत्रामध्ये तीन कंत्राट कंपन्यांची निविदा पध्दतीबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारे हे पत्र सर्व अतिरिक्त आयुक्त, माहिती व तंत्रज्ञान, सर्व विभागांचे प्रमुख अभियंता व पोलीस विभागांसह गटनेत्यांनाही पाठवले आहेत. त्यामध्ये त्यांनी आयटी विभाग व सॅपचे कंत्राट कंपनीच्या कर्मचाऱ्यांबाबत शंका उपस्थित केली आहे. काही मोजक्या कंत्राट कंपन्यांचे संचालक व मालक हे सॅप हाताळणारे कर्मचारी व आयटी विभागातील कर्मचारी यांना हाताशी धरून कंत्राट कामांमधील निविदेतील बोली जाणून घेत त्याप्रमाणे कमी बोली लावून निविदा भरून कामे मिळवत आहेत, असा धक्कादायक प्रकार त्या पत्राद्वारे उघड केला आहे. यामध्ये त्यांनी सर्वात निविदा भरणाऱ्या कंपनीलाच कशाप्रकारे कामे लागली आहेत, याचीही जंत्री सादर केली आहे.

निनावी पत्रात चौकशीची मागणी.

मुबंई महापालिकेला प्राप्त झालेल्या निनावी पत्रामुळे खळबळ माजली असली तरी पालिका प्रशासन याची दखल घेणार हा प्रश्न कायम आहे. निनावी पत्र पाठवणाऱ्या कंत्राटदारानं चौकशीची मागणी केली आहे. तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदी पद्धती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीय.

28 जानेवारीला पडला लेटरबॉम्ब

तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीबाबत चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेकडे 28 जानेवारीला प्राप्त झाले. त्या पत्राची प्रत महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, आयटी विभाग प्रमुख, सर्व विभागांचे प्रमुख अभियंता, सर्व राजकीय पक्षांचे गटनेते आणि मुंबई पोलीस यांना पाठवण्यात आली आहे. त्या पत्रात तक्रारदाराने आयटी विभागाचे कर्मचारी आणि सॅप कंपनीचे कर्मचारी यांच्याबाबत शंका उपस्थित केली आहे. काही कंत्राटदार आयटी विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंत्राट कामातील अन्य कंत्राटदारांनी भरलेल्या निविदेतील बोली जाणून घेत स्वतः कामाची कमी बोलीची निविदा भरत कामे मिळवतात, अशी धक्कादायक माहिती पत्रामध्ये उघड करण्यात आली आहे.

निनावी लेटर पाठवणाऱ्या व्यक्तीनं ठराविक कंपनीना कशाप्रकारे कामे मिळत असल्याची जंत्रीच सादर केलीय. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वादात सापडणारी मुंबई महापालिका आणखी एका वादात सापडली आहे. निनावी लेटर बॉम्बवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

BMC च्या अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचे लक्ष, कोव्हिड ते कोस्टल रोड, कोणते महत्वाचे निर्णय अपेक्षित?

धनदांडग्यांवर सवलतीचा पाऊस अन् मुंबईकरांची पाकीटमार; महापालिका दिवाळखोरीत काढल्याचा भाजपचा आरोप

(Unknown Person wrote letter to BMC and Political Parties over irregularities in SAP System )

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.