Corona Vaccination: मुंबई महानगरात कोविड लसीच्या पहिल्या मात्रेने ओलांडला एक कोटीचा टप्पा!

लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून 4 मे 2021 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. स्तनदा मातांसाठी 26 मे 2021 पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरीता 1 जून 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.

Corona Vaccination: मुंबई महानगरात कोविड लसीच्या पहिल्या मात्रेने ओलांडला एक कोटीचा टप्पा!
मुंबईत उद्यापासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 7:05 PM

मुंबई : कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून 1 कोटी पहिल्या मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील कोविड लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होण्याच्या आतच विक्रमी वेळेत मुंबईने ही कामगिरी बजावली आहे. मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे 1 कोटी 81 लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे.

3 जानेवारी 2022 पासून नवयुवकांचे लसीकरण सुरु

मुंबईसह देशभरात 16 जानेवारी 2021 रोजी कोविड – 19 प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱयांसाठी 5 फेब्रुवारी 2021; 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी 1 मार्च 2021; 45 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी 1 एप्रिल 2021; 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 1 मे 2021 पासून लसीकरण सुरु करण्यात आले. नुकतेच 3 जानेवारी 2022 पासून वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील नवयुवकांचे देखील लसीकरण सुरु झाले आहे.

विविध समाज घटकांसाठी विशेष लसीकरण

मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून 4 मे 2021 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले.

स्तनदा मातांसाठी 26 मे 2021 पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरीता 1 जून 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तींसाठी 23 जून 2021; गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी 14 जुलै 2021 पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन 2 ऑगस्ट 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.

वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर

यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि 18 वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.

लसीकरणात मुंबई महापालिकेची विक्रमी कामगिरी

लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये पहिल्या मात्रेचा विचार करता, 31 मे 2021 रोजी 25 लाख, 19 जुलै 2021 रोजी 50 लाख, 15 सप्टेंबर 2021 रोजी 75 लाख आणि आज 5 जानेवारी 2022 रोजी दुपारअखेर 1 कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला आहे.

पहिली आणि दुसरी मात्रा यांचा एकत्रित विचार करता, 5 मे 2021 रोजी 25 लाख, 26 जून 2021 रोजी 50 लाख, 7 ऑगस्ट 2021 रोजी 75 लाख, 4 सप्टेंबर 2021 रोजी 1 कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला. त्यानंतर, 28 सप्टेंबर 2021 रोजी 1 कोटी 25 लाख, 10 नोव्हेंबर 2021 रोजी 1 कोटी 50 लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. आज 5 जानेवारी 2022 रोजी दुपारअखेर 1 कोटी 81 लाखांहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

मुंबई महानगरात 18 वर्षांवरील नागरिकांचा विचार करता, एकूण 92 लाख 36 हजार 500 मुंबईकरांना दोन्ही लसी देवून लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. त्या तुलनेत, 99 लाख 80 हजार 629 नागरिकांना पहिल्या मात्रा आज दुपारअखेर दिल्या गेल्या आहेत. निर्धारित लक्ष्यांकाच्या तुलनेत हे प्रमाण 108 टक्के इतके आहे. तर दुसऱ्या मात्रा 88 टक्के म्हणजे 81 लाख 37 हजार 850 इतक्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

सुमारे 9 लाख 22 हजार नवयुवकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य

मुंबई महानगरात 15 ते 18 वर्ष वयोगटाचा विचार करता, राज्य शासनाने 6 लाख 12 हजार 461 नवयुवकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नेमून दिले आहे. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 2021 च्या अंदाजित लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 9 लाख 22 हजार नवयुवकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 3 जानेवारी 2022 रोजी या वयोगटाचे लसीकरण सुरु झाले असून आतापर्यंत सुमारे 15 हजार 110 नवयुवकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरी मात्रा देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे. (Vaccination of one crore citizens under Kovid vaccination campaign in Mumbai metropolis)

इतर बातम्या

‘मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?’ आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सवाल

VIDEO: अब्दुल सत्तारांचं युतीबाबत मोठं विधान, देवेंद्र फडणवीस म्हणतात, नया है वह!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.