महाविकास आघाडीत बिघाडी, ‘आमचा बैठकीत अपमान झाला’, ‘वंचित’चा आरोप

महाविकास आघाडीची आज जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला देखील देण्यात आलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर बैठकीला गेले. पण या बैठकीत आमचा अपमान झाला, असा आरोप पुंडकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी, 'आमचा बैठकीत अपमान झाला', 'वंचित'चा आरोप
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 5:42 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीची आज हॉटेल ट्रायडेंट येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे. या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीलादेखील देण्यात आलं होतं. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे गेले. पण बैठक अपूर्ण असतानाच ते बाहेर पडले आहेत. आमचा बैठकीत अपमान झाला, अशी प्रतिक्रिया पुंडकर यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीतून बाहेर पडल्यानंतर दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चेसाठी गेल्यानंतर तिथे आम्हाला तुम्ही बाहेर थांबा असं सांगितलं. त्यानंतर आम्हाला तब्बल एक तास बाहेर ठेवलं. आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत की नाही?”, असा सवाल धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला.

“मनोज जरांगे पाटील आणि ओबीसींच्या आंदोलनाबाबत भूमिका घ्या, संदिग्ध राहू नका. तुमचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर तो फॉर्म्युला आम्हाला सांगा. त्यांचं आपापसात काही ठरलेलं नाही. त्यांचा आपापसात ताळमेळ नाही. त्यांचंच काही ठरलेलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही. आम्ही सुरुवातीला एक-दीड तास बैठकीला बसलो. आम्ही त्यांना सांगितलं की या-या विषयांवर तुम्ही भूमिका मांडा. तसेच महाविकास आघाडीमध्ये आधी आम्हाला घ्या. आम्हाला तसं पत्र द्या. त्यावर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विचार करतो. पण तेव्हापासून आम्ही बाहेर बसलो आहोत”, अशी प्रतिक्रिया धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली.

‘आम्ही त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला’

“आम्ही सीट मागितलेल्या नाहीयत. त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला आहे. तुमचं पहिले ठरल्यानंतर आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही बोलू. आम्ही बैठकीच्या बाहेर असल्यामुळे त्यांना जातो असं सांगून आलेलो नाही. पण ही वागणूक योग्य नाही. त्यांच्याकडून अपमानास्पदच वागणूक मिळाली आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत. आम्ही वर्षानुवर्षे रस्त्यावर भांडणारे लोकं आहोत”, असं पुंडकर म्हणाले.

“चर्चेची दारे बंद झाली असं आम्ही म्हणत नाहीत. आम्ही पक्षस्तरावर चर्चा करु. आमचं सीट शेअरिंगबद्दल त्यांनी त्यांचा फॉर्म्युला ठरला असेल तर सांगावा. नसेल तर आमचा 12-12-12-12 चा फॉर्म्युला मान्य करावं. त्यांचंच ठरत नाही. त्यांच्यात भांडणं सुरु आहे. हे ठरलेलं आहे. आपल्याला कुणी कशी वागणूक दिली तर त्याबाबत पक्षस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल”, अशी सूचक प्रतिक्रिया पुंडकर यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.