‘आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार’, प्रकाश आंबेडकर यांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज

महाविकास आघाडीत जाण्यास आपण तयार आहोत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी TV9च्या मुलाखतीत सांगितलंय. तसंच प्रकाश आंबेडकरांनी थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलंय.

'आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार', प्रकाश आंबेडकर यांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:42 PM

मुंबई : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सहभागी होण्याची इच्छा नाही, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आधी काँग्रेस राष्ट्रवादीलाच इशारा दिलेला. मात्र tv9च्या मुलाखतीत, आंबेडकरांनी आता मविआत सहभागी होण्याची तयारी दाखवलीय. पण निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घ्यावा असंही वंचित प्रमुख म्हणालेत. सध्या कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक होतेय. चिंचवडमध्ये राहुल कलाटेंच्या बंडखोरीमुळं आधीच राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलंय. पण प्रकाश आंबेडकरांनी त्यात भर घातलीय. कारण राहुल कलाटेंच्याच बाजूनं वंचितचे मतदार मतदान करणार आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाशी युती केलीय. मात्र महाविकास आघाडी म्हणून लढलो तर 200 जागा आणि वंचित-ठाकरे गट दोघे मिळूनच दीडशे जागा जिंकणार असा दावाही आंबेडकरांचा आहे.

हे सुद्धा वाचा

दीडशे जागांचा दावा करतानाच, आंबेडकरांनी थेट पंतप्रधान मोदींना आव्हान दिलंय. आपल्याकडे हक्काचे 15 टक्के मतदार असून कधीही मॅजिक करु शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत.

आता महत्वाचा प्रश्न हा आहे की, वंचित महाविकास आघाडीचा भागच झाली नाही. तर आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करणार का?

प्रकाश आंबेडकरांनी मविआत जाण्याची तयारी तर दर्शवलीय. आता त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कोर्टात बॉल टाकलाय. त्यामुळं भविष्यात काय होतं हे दिसेलच.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.