Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैठकीला बोलावलं, पण एक तास बाहेर बसवून ठेवलं, महाविकास आघाडीची ‘वंचित’सोबत वागणूक

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना एक तास बाहेर बसवून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली आहे.

बैठकीला बोलावलं, पण एक तास बाहेर बसवून ठेवलं, महाविकास आघाडीची 'वंचित'सोबत वागणूक
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 5:41 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी याचं जुळता जुळत नाही, अशी परिस्थिती बघायला मिळत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं, अशी वंचित बहुजन आघाडीची देखील भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडी राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीत सहभागी होण्यास तयार आहे. पण ठाकरे गट वगळता इतर दोन पक्षांकडून हवा तसा वंचित बहुजन आघाडीला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली. त्यांनी काँग्रेसवर टीका देखील केली. याबाबत महाविकास आघाडीतील राजकारण ढवळून निघाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आयोजित बैठकीला येण्याचं निमंत्रण देण्यात आलं. पण या बैठकीत आपला अपमान झाला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे.

धैर्यवर्धन पुंडकर यांच्या नाराजीमागील आणि आरोपामागील कारणही अगदी तसंच आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अधिकृत निमंत्रण आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांना प्रतिनिधी म्हणून पाठवण्यात आलं होतं. त्यानुसार ते आज मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंट येथे गेले. पण त्यांच्यासोबत वेगळाच प्रकार घडला. महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनी तुम्ही बाहेर थांबा असं सांगून बाहेर बसवलं. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही काळ चर्चा करायची असेल म्हणून पुंडकर बाहेर बसले. पण एक ते सव्वा तास झाल्यानंतरही त्यांना बाहेर बसवून ठेवण्यात आलं. त्यामुळे वाट पाहून वैतागलेले पुंडकर हे ट्रायडेंट हॉटेलच्या बाहेर पडले. त्यांनी प्रसारमाध्यांना यावेळी वंचितचा बैठकीला बोलवून अपमान करण्यात आला, अशी प्रतिक्रिया दिली.

बैठकीला पुंडकर यांनी आधी ठराव मांडले, नंतर त्यांना बसवून ठेवलं

धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा महत्त्वाची माहिती दिली. बैठक सुरु झाली तेव्हा आपण सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडली. महाविकास आघाडीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. तसेच तुमच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आम्हाला सांगा, यासह आणखी काही मुद्दे पुंडकर यांनी मांडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुंडकर यांना बाहेर बसण्याचं आवाहन केलं. पुंडकर बाहेर बसले. पण बराच वेळ झाला तरी आपल्याला बैठकीसाठी आतमध्ये न बोलावल्याने पुंडकर हे तिथून बाहेर पडले.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.