प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडीला धक्का देणारं विधान; लोकसभा निवडणुकीबाबत मोठा इशारा

या नव्या संघर्षाला तोंड द्यायचं असेल तर धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. पण पँथर स्टाइल धर्माची चिकित्सा नको. आपण आपलं भांडवल दाखवत नाही. त्यामुळे धर्माला लोक बळी पडत आहेत. देश हा भौगोलिक दृष्ट्या असतो. कल्चरवर आधारित नसतो. आपण ज्याच्यावर लढाईच्या संदर्भात विश्वास ठेवत आहोत ते लढाईला तयार आहेत की भित्रे भागोबा आहेत याचा विचार झाला पाहिजे. सगळे एकत्र आले पाहिजे, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडीला धक्का देणारं विधान; लोकसभा निवडणुकीबाबत मोठा इशारा
Prakash AmbedkarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 7:41 PM

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 24 डिसेंबर 2023 : एकीकडे महाविकास आघाडीने राज्यात ताकदीने लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीवरून मोठं भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीला धक्का देणारं हे विधान असल्याची चर्चा सुरू आहे. तुम्हाला आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. उद्या एकत्र येणार नसाल तर आम्ही सर्वांनी 48 च्या 48 जागा स्वबळावर लढवल्या पाहिजे. त्याही ताकदीने लढवल्या पाहिजे, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. उद्या काय होईल ते जाऊ द्या. पण रिलिजीयस आयडेंटी तुम्ही क्रॅक करून चळवळीची आयडेंटीटी पुन्हा प्रस्थापित करता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. इतर राज्यात काय करता येईल माहीत नाही. पण महाराष्ट्रात बरंच काही करता येईल. मात्र विरोधक एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही. एकत्र येणार नसतील तर 48 जागा ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काय निवडणार? चळवळ की कुटुंब?

यावेळी त्यांनी तुम्ही चळवळ निवडणार की कुटुंब? असा सवाल केला. तुम्ही चळवळ निवडली की कुटुंब तुरुंगात जातं. चळवळीसाठी सर्वच लालूप्रसाद यादव होत नाहीत. सगळे काही निवडणुकीत एकत्र येणार नाहीत हे आपल्याला सगळं काही माहीत आहे. ते कुटुंबाला प्राधान्य देणार आहेत. जे कुणी इथे आहेत ते कुटुंबातून येणार आहेत. कुणी चळवळीतून आले नाही आहेत, असं सांगतानाच कुणीही रिलिजीअस आयडेंटिटीला खतपाणी घालू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

माझ्याशी कुणाचीही चर्चा नाही

महाविकास आघाडीचा जागेचा फॉर्म्युला ठरला आहे. वंचितला दोन जागा सोडण्यात येणार आहे, अशा बातम्या सुरू आहेत, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. माझ्याशी कोणाचीही अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला कोणी आणला मला माहीत नाही, असं आंबेडकर म्हणाले.

संघाला पटेलांच्या तीन अटी

यावेळी त्यांनी संविधान निर्मितीच्या कालखंडावर भाष्य केलं. 1946 ते 1949 दरम्यान संविधान निर्मितीच्या संदर्भात चर्चा सुरू होती. आणि 26 जानेवारी 1950ला संविधान स्वीकारलं गेलं. पण काही लोकांचा हा संविधान स्वीकारायला विरोध होता. त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी तेव्हाच्या संघ प्रमुखाला तीन अटी टाकल्या होत्या. अशोक चक्र मान्य करावे लागणार, 14 नव्हे 15 ऑगस्टला स्वातंत्र दिवस मानावा लागणार, तुम्हाला संविधान मान्य करावे लागेल. पण संघाने सरदार पटेलांनी घातलेल्या या अटी मान्य केल्या नाहीत. 14 तारखेला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस असतो. त्याच दिवशी संघाने स्वातंत्र्य दिन साजरा केला. संघ 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन मानत नाही, असं त्यांनी सांगितलं.

नवं संविधान आलंय

संविधानाची निर्धार सभा 70 वर्षांनी घ्यावी लागत आहे. याचाच अर्त समाजात अजून विचार रुळलेले नाहीत. समतावादी विचारसरणीचा लढा पुढे घेऊन जायचा आहे. नवीन भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपण नेमकं कुठे कमी पडत आहोत याचा विचार केला पाहिजे. एकेकाळी समाजवादी आणि मार्क्सवादी विचारसरणी हाइटवर होती. पण त्यांची हाईट कमी झाली. आता धर्म हा आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे, असं ते म्हणाले. हे संविधान वाचवायच असेल तर घराबाहेर पडावं लागेल. नवीन संविधान आलं आहे. ज्यांना कोणाला बघायचं असेल तर त्यानी संसदेत जावं आणि बघावं, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.