AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूआधीची 3 सेकंद! तोल गेला, मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली डोकं येऊन दोघंही जागीच खल्लास

Vasai Road Accident CCTV Video : वसईत सोमवारी झालेल्या दुचाकीच्या या अपघाताचं सीसीटीव्ही आता व्हायरल होतंय. मुंबई अहमदाबाद मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या दोघांचाही जीव गेलाय.

मृत्यूआधीची 3 सेकंद! तोल गेला, मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली डोकं येऊन दोघंही जागीच खल्लास
काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघातImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 3:27 PM

वसई: रस्ते अपघातात भारताची आकडेवारी ही इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती नुकतीच नितीन गडकरी यांनी दिली होती. रस्ते अपघात कसे रोखायचे, असा प्रश्न आजही कायम आहे. अशातच आता वसईतील अपघातातचं (Road Accident in Vasai) एक थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. वसईत सोमवारी झालेल्या दुचाकीच्या या अपघाताचं सीसीटीव्ही (Accident CCTV) आता व्हायरल होतंय. मुंबई अहमदाबाद मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या दोघांचाही जीव (Dead on the spot) गेलाय. यावेळी बाईकवरुन जाणाऱ्या दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं. दरम्यान, या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही नोंद करुन घेतला असून याप्रकरणी कंटेनर चालकाला अटकही करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावीरल पेल्हार फाटा इथं हा अपघात घडला होता. दुचाकीवरुन दोघं जणं जात होती. डाव्या बाजूनं दुचाकी जात होता. दरम्यान, मागून कंटेनर येत होतो. नेमका याच दरम्यान, दुचाकीस्वारांचा तोल गेला आणि बाईकवरील दोघंही जणांचं टोकं कंटेनरच्या चाकाखाली आलं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय.

व्हिडीओमध्ये काय दिसलं?

सोमवारी (21 मार्च) रोजी हा अपघात घडला. सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान, ही घटना घडली. रस्त्याशेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताचा हा थरार कैद झाला आहे.

3 सेकंदात खेळ खल्ला!

या अपघाताचा एक 17 सेकंदाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही बाईक आणि गाड्या सर्विस रोडवर हायवेवर जाताना दिसत आहेत. दहाव्या सेकंदाच्या पुढे एक दुचाकी हायवेवरुन येताना दिसते. दोघंजण या बाईकवर बसलेले असतात. याच बाईकच्या मागून एक मालवाहू कंटेनरही येत असतो.

दरम्यान, सर्विस रोडवरुन एक टेम्पो हायवेवर येत असतो. बाईक डाव्या बाजूनं टेम्पो रस्त्यावर येतोय पाहून उजव्या बाजूला सरकताना दिसून आली आहे. दरम्यान, याच वेळी अचानक बाईकवर चालकाचा तोल जातो. तोल जाऊन बाईकवरील दोघांचही डोकं हे कंटेनरच्या चाकाखाली येतं. काळजाचा थरकाप उडवणारा मृत्यूचा हा थरार अवघ्या तीन सेकंदांच्या आत घडतो.

काही वेळ आजूबाजूच्या वाहनांनाही काय झालंय, ते लक्षात येत नाही. दरम्यान, दोघंजण रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडल्याचं पाहून या संपूर्ण थरारक घटनेचा उलगडा होतो. दुर्दैवानं बाईकवरुन जाणाऱ्या दोघांनीही हेल्मेट घातलेलं नाहीये. कदाचित हेल्मेट असतं, तर या दोघांचा जीव वाचू शकला असता. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ते अपघातांची दाहकता अधोरेखित झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

पाहा Road Accident वर नितीन गडकरी काय म्हणाले?

संबंधित बातम्या :

सिलिंग कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्यासह दोन मुलं गंभीर

आता विश्वास कुणावर ठेवयचा ? पुण्यात सावत्र वडिलांकडून16 वर्षीय मुलीवर बलात्कार\

उत्तर प्रदेशात चार चिमुरड्यांचा मृत्यू, दारात फेकलेल्या टॉफी खाल्ल्याने जीव गेल्याचा आरोप

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.