AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक, मध्यरात्री अडीच तास खलबतं; ‘त्या’ युतीला सुरुंग लागणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री ही बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे आणि आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक, मध्यरात्री अडीच तास खलबतं; 'त्या' युतीला सुरुंग लागणार?
एकनाथ शिंदे आणि आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक, मध्यरात्री अडीच तास खलबतंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 9:36 AM

मुंबई: एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री ही बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे गुलदस्त्यात आहे. मात्र, आंबेडकर यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी सर्व दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेलाही युतीसाठी आवाहन केलं होतं. आंबेडकर यांच्या या आवाहनाला शिवसेनेने प्रतिसादही दिला होता. या युतीच्या स्वरुपाबाबत चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महापालिका निवडणुका आणि विधान परिषदेत बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या युतीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, आता शिंदे-आंबेडकर यांच्या भेटीने या युतीला सुरुंग लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे,

प्रकाश आंबेडकर हे भाजपसोबत जाणार नाहीत. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यासोबत यावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत. काल मध्यरात्रीच्या भेटीत याच विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे वंचितच्या नेत्यांनी या भेटीला दुजारो दिला आहे. आंबेडकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. मात्र, इंदूमिलच्या स्मारकाबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं वंचितच्या सूत्रांनी सांगितलं. मात्र, इंदूमिलची चर्चा करण्यासाठी मध्यरात्री जाण्याची गरज काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. ही भेट दिवसाही होऊ शकली असती. शिवाय इंदूमिलच्या स्मारकाबाबत बैठक होती तर या बैठकीला अधिकारी का उपस्थित नव्हते असा प्रश्नही विचारला जात आहे.