महागाईचा असाही फटका… ग्राहक एक किलोवरून अर्धा किलोवर; किचनच्या बजेटला फिफ्टी पर्सेंट कात्री

Vegetable Inflation : महागाईने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. त्यातच भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भाजीपाला महागल्याने ग्राहकांची खरेदी एका किलोवरुन अर्ध्या किलोवर आली आहे. किचन बजेट कोलमडले आहे.

महागाईचा असाही फटका... ग्राहक एक किलोवरून अर्धा किलोवर; किचनच्या बजेटला फिफ्टी पर्सेंट कात्री
भाज्या कडाडल्या
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 5:08 PM

महागाईने सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीने सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूरच नाही तर राज्यातील अनेक भागातील बाजारात भाजीपाला महागला आहे. वाढलेल्या दराने ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला. ग्राहकांची खरेदी एक किलोवरुन अर्ध्या किलोवर आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांचे किचन बजेट कोलमडले आहे.

वातावरण बदलाचा मोठा फटका

गेल्या पंधरवड्यापासून पूर्वमोसमी पाऊस, वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादनाला फटका बसला. राज्यातील काही भागात मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस झाला. विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला. यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी होऊन दरवाढ झाली. बाजारातील भाजीपाल्याची आवक कमी झाली. पालेभाज्या व फळभाजांची दरवाढ झाली. सध्या गवार, चवळी व वालशेंगा १०० रुपये, टोमॅटो ६० रुपये, गवार १०० रुपये, तर मेथी १२० रुपये किलोवर पोहोचली आहे. सर्वाधिक २०० रुपये किलो दर कोथंबीरला मिळत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाला कडाडल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजीपाल्याचे दर गगनाला

पावसाळ्यामुळे आता भाजीपाल्याचे दर गगनाला पोहोचले आहे. राज्यातील अनेक भागात स्वयंपाकात लागणारी कोथिंबीर व मिरची थेट शंभर रुपये किलोवर गेले आहेत. तसेच टोमॅटोही 60 रुपये किलोने मिळत आहे. सध्या बाजारात मिरची व कोथंबीर 90 ते 100 रुपये किलोवर गेले आहे.टोमॅटो 60 रुपये किलो, गिलके 80 रुपये, बटाटे 40 रुपये, वांगी 80 रुपये, भेंडी 90 रुपये, कारले 60 रुपये, पलकोबी 80 रुपये, शिमला मिरची 80 रुपये, दुधी भोपळा 60 रुपये, कोबी 60 रुपये, कैरी 70 रुपये दराने विक्री होत आहे.

बजेट बिघडले

गेल्या पंधरवड्यात झालेल्या वादळासह अवकाळी पावसाने भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने गेल्या आठवडाभरापासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिबीर जागेवरच खराब झाली.

जून महिना अखेर किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्या पर्यंत भाज्यांचे भाव असेच असतील अशी माहिती विक्रेत्यांनी दिली त्यामुळे सामान्य ग्राहकांना अजून काही दिवस वाढत्या किमतीत भाजी खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरातील बजेट बिघडले आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.