चिकनपेक्षा मेथी महाग, नागपूरमध्ये भाज्यांचे दर शंभरीपार, मुंबई पुण्यातही भाजापीला महागला; खायचं काय बटाटे?
मुंबईत कांदा-बटाटा वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. काही दिवसांपूर्वी 20 रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता 45 रुपयांवर पोहोचला आहे.
मुंबई: लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुण्यात भाजीपाला महागला आहे. नागपूरमध्ये तर चिकनपेक्षा मेथी महागली आहे. नागपूरमध्ये एक किलो मेथी 340 रुपयांना मिळतेय. तर, पुण्यात देखील भाजपील्याच्या दर महागल्याची माहिती आहे.
मुंबईत भाजीपाला का महागला?
मुंबईत कांदा-बटाटा वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. काही दिवसांपूर्वी 20 रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता 45 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 40 रुपयांना विकली जाणारी गवार 100 रुपये किलो अशी विकली जात आहे. प्रत्येक भाज्यांमागे 20 ते 30 रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. वाशी येथील ‘एपीएमसी’च्या भाजीपाला बाजारात मंगळवारी आवक कमी झाली आहे. बाजारात रोजच्या सुमारे 600 गाड्यांऐवजी 484 गाड्या भाज्यांची आवक झाली असून, आधी प्रतिकिलो 10 ते 20 रुपयांनी मिळत असलेल्या भाज्यांचा दर आता 20 ते 30 रुपये प्रतिकिलो झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.
नागपुरात चिकनपेक्षा मेथी महाग
नागपूरात चिकनेक्षाही भाजीचा दर जास्त झालाय. चिकन 220 रुपये किलो तर मेथी 340 रुपये किलो आहे. नागपुरातील किरकोळ बाजारात भाजीपाला महागल्यानं महागाई गगनाला भिडलीय. मेथीची भाजी 340 रुपये किलो, गवार 140 रुपये, शेवगा 160 रुपये आणि वांगी 120 रुपये किलो असा सध्याचा दर आहे. नागपुरातील किरकोळ बाजारात भाज्यांचे हे गगनाला भिडलेले दर पाहून ग्राहकांना महागाईचा शॅाक लागण्याची वेळ आलीय. सततच्या पावसामुळे नागपूरच्या बाजारात भाज्यांची आवक कमी झाली. त्यामुळे नागपुरात भाज्यांचा दर गगनाला भिडलाय. पुढचा महिनाभर ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नागपुरातील भाजीपाल्याच्या महागाईचा आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.
नागपूरमधील भाजीपाल्याचे दर
मेथी – 340० रुपये किलो फुलकोबी – 120 रुपये किलो गवार – 140 रुपये किलो पालक – 120 रुपये किलो वांगी – 120 रुपये किलो भेंडी – 120 रुपये किलो चवळी शेंगा – 120 रुपये किलो कोथिंबीर – 120 रुपये किलो शेवगा – 160 रुपये किलो
पुण्यात भाजीपाला महागला
लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि आता पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे पुण्यातं भाज्यांचे दर हे दुपटीने वाढलेत. कांदा-बटाटा आणि कोबी वगळता बहुतांश सर्व भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झालीये. त्यामुळं आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आणखी झळ सोसावी लागत आहे..काही दिवसांपूर्वी मागणीच्या तुलनेत घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर घटले होते. शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात भाज्यांची विक्री केली. घाऊक बाजारांमध्ये कवडीमोल दर मिळाल्याने टोमॅटो, ढोबळी मिरची शेतकऱ्यांनी फेकून दिली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भाजीपाला लागवडीवर लक्षणीय परिणाम झाला. पुरेशी लागवड न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांची आवक कमी होत आहे.
पुण्यातील किरकोळ बाजारात एक किलोचे दर
कोथिंबीर: 25 ते 30 रु. मेथी: 25 ते 30 रु. गवार: 100 ते 120 रु. वांगी: 60 ते 70 रु. मटार: 140 ते 160 रु. घेवडा : 80 ते 100 रु. भेंडी: 70 ते 80 रु. राजमा: 80 ते 100 रु. फ्लॉवर : 100 ते 120 रु.
इतर बातम्या:
संजय राऊत मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
सत्ताधारी भाजपला नाशिकमध्ये घरचा आहेर; रस्ते कामाच्या चौकशीची आमदार फरांदे यांची मागणी
Vegetables rate today nagpur mumbai pune vegetables rate increased check rates of your city